India vs Australia 2020 | स्टीव्ह स्मिथचा दणका, सलग दुसरी शतकी खेळी, 62 चेंडूत खणखणीत शतक

ऑस्ट्रेलियाचा तगडा बॅट्समन स्टीव्ह स्मिथने भारताला चांगलाच दणका दिला आहे. सलग दोन मॅचमध्ये त्याने दणदणीत शतके झळकावली आहेत.

India vs Australia 2020 | स्टीव्ह स्मिथचा दणका, सलग दुसरी शतकी खेळी, 62 चेंडूत खणखणीत शतक
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 1:02 PM

सिडनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Australia) यांच्यात सिडनीच्या ग्राऊंडवर दुसरा वनडे सामना पार पडत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तगडा बॅट्समन स्टीव्ह स्मिथने भारताला चांगलाच दणका दिला आहे. सलग दोन मॅचमध्ये त्याने दणदणीत शतके झळकावली आहेत. आज पुन्हा एकदा अवघ्या 62 चेंडूत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. भारताविरुद्ध त्याची बॅट नेहमीच तळपते. अगदी या सिरीजमध्ये देखील त्याच्या बॅटचा चांगलाच बोलबाला राहिलेला आहे. (Ind Vs Aus Australia Steve Smith Consecutively 2nd Century Against India)

आजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कमाल केली. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि अ‌ॅरॉन फिंचने (Aron Finch) पहिल्या विकेटसाठी 142 रन्सची भागीदारी रचली. मालिकेत दुसऱ्यांदा डेव्हिड वॉर्नर-अ‌ॅरॉन फिंच जोडीने शतकी सलामी दिली. ही जोडी मोहम्मद शमीने फोडली. त्यानंतर खेळायला आलेल्या स्टीव्ह स्मिथने चौकारांची आतषबाजी केली. आपल्या शतकी खेळीत त्याने 14 चौकार लगावले तर दोन गगगुचंबी षटकार ठोकले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात 62 बॉलमध्ये त्याने शतक खळकावलं होतं. अगदी याच अंदाजात त्याने आजही बॅटिंगला सुरुवात केली. ड्रेसिंग रुममधून सेट होऊन आल्यासारखं त्याने अगदी पहिल्या बॉलपासून आक्रमक फटके मारले. मैदानाच्या चारही कोपऱ्यात त्याने फटके लगावले. कुठलंही दडपण न घेता अगदी सहजपणे तो फटके खेळत होता.

तत्पूर्वी, कांगारुंच्या ओपनिंग जोडीच्या बहारदार परफॉरमन्सनंतर भारताच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. इतिहासात आतापर्यंत असा विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला नव्हता. भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदा घडलीये की सलग तीन मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या ओपनिंग जोडीने शतकी भागीदारी रचली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर-अ‌ॅरॉन फिंच जोडीने पहिल्या विकेटसाठी 156 रन्सची पार्टनरशीप केली. आज तोच कित्ता गिरवत फिंच-वॉर्नर जोडीने 142 रन्सची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन दिली. या  दोन मॅचच्या अगोदर भारत शेवटचा एकदिवसीय सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्या शेवटच्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या ओपनिंग जोडीने शतकी सलामी दिली होती. न्यूझीलंडच्या ओपनर्सनी 106 धावांची भागीदारी केली होती.

भारताने आतापर्यंतच्या इतिहासात 978 एकदिवसीय मॅच खेळल्या आहेत. या मॅचेसमध्ये असं एकदाही झालं नव्हतं की प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समनने भारताविरुद्ध सलग तीनदा शतकी भागीदारी रचल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या नावे आता नको असणारा विक्रम नोंदवला गेला आहे.

(Ind Vs Aus Australia Steve Smith Consecutively 2nd Century Against India)

संबंधित बातम्या

India vs Australia 2020 | विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू

Ind vs Aus 2020, 2nd ODI Live Score Updates | ऑस्ट्रेलिया पहिला धक्का, अ‌ॅरॉन फिंच 60 धावांवर बाद

India vs Australia 1st ODI  : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव

Photo | IND vs AUS : सिडनी वनडेमध्ये या पाच कारणांमुळे भारताचा पराभव, कांगारुंची दादागिरी!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.