देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राजपथावर देशाच्या सामर्थ्याची झलक, वांद्र्यात आदित्य ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण

देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे.  मोठ्या उत्साहात 71 वा प्रजासत्ताक दिवस (Republic Day) साजरा केला जात आहे.

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राजपथावर देशाच्या सामर्थ्याची झलक, वांद्र्यात आदित्य ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 4:51 PM

मुंबई : देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे.  मोठ्या उत्साहात 71 वा प्रजासत्ताक दिवस (Republic Day) साजरा झाला. दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण (Republic Day) करण्यात आले. या कार्यक्रमाला ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत यंदाचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सर्व पालकमंत्री त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात ध्वजारोहण केले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले.

महाराष्ट्राचा चित्ररथ:

देशाचा प्रजाससत्ताक दिन मोठ्या उत्साहात शिवाजी पार्क मैदानावर साजरा झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हस्ते ध्वजारोहण केले जाणार असून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.

यावर्षी नव्याने मुंबई पोलीस दलात सामील करण्यात आलेल्या अश्वदलाची संचालनाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. अश्वदलाकडून तिरंग्याला मानवंदना दिली. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची प्रतिकृती चित्ररथाद्वारे दाखवण्यात येणार आहे. हे आजच्या संचालनाचे प्रमुख आकर्षण आहे.

शिवाजी महाराजांच्या समुद्रीसीमा बंदिस्ती करण्यासाठी उभारलेल्या आरमाराची प्रतिकृती यावेळी पाहायला मिळणार असून, आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांची यशोगाथा या चित्ररथातून मांडण्यात आली आहे.

आज साजरा होणाऱ्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवण्यात येणार आहे. हा चित्ररथ शिवाजी पार्कमध्ये ठेवण्यात आला असून अनेकांनी तो पाहण्यासाठी गर्दी करायला सुरूवात केली. यावेळी राज्याचे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे.

गडचिरोलीत 103 आदिवासी बांधवांचं पारंपरिक गोंडी नृत्य

प्रजासत्ताक दिनानिमित्त गडचिरोलीचे 103 आदिवासी बांधव पारंपरिक गोंडी नृत्य सादर करण्यात आले. तर मुंबई पोलीस आता घोड्यावरून गस्त घालताना दिसणार आहेत. शिवाजी पार्कमधल्या कार्यक्रमात हे अश्वपथक सहभागी होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालय आणि बीएमसीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी या दोन्ही शासकीय इमारतींवर तिरंग्याच्या रंगांची उधळण करण्यात आली होती.

71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण न्यायालायाचा परिसर उजळून निघाला होता. विद्युत रोषणाई पाहण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.

देशभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नऱ्हे भागातील झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी भव्य मानवी तिरंगा साकारला. यात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमा देखील साकारण्यात आल्या. ४ हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

धुळे शहरातून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर १ हजार १११ फुटाच्या तिरंग्यासह रॅली काढण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या वतीने या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.

साताऱ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ३०० फुटी तिरंगा रॅली काढण्यात आली. पोवई नाका ते राजवाडा या भागात ही रॅली काढण्यात आली. शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.