भारतीय वायूदलाची ताकद वाढली, चिनूक हेलिकॉप्टर चुणूक दाखवणार!

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या ताफ्यात आज ‘चिनूक’ हेलिकॉप्टर सामील झाले. अमेरिकी कंपनी बोईंगने बनवलेली ही 4 चिनूक सीएच-47 हेलिकॉप्टर चंदीगडमधील हवाई दलाच्या विमानतळावर दाखल झाली आहेत. अशी एकूण 15 हेलिकॉप्टर खरेदी केली जाणार आहेत. चिनूक हे हेव्हीलिफ्ट हेलिकॉप्टर असून अगदी उंच ठिकाणांवरही मालवाहतूक व सैनिकांच्या दळणवळणासाठी याचा वापर होणार आहे. भारताने 2015-16 मध्ये मागवलेल्या […]

भारतीय वायूदलाची ताकद वाढली, चिनूक हेलिकॉप्टर चुणूक दाखवणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या ताफ्यात आज ‘चिनूक’ हेलिकॉप्टर सामील झाले. अमेरिकी कंपनी बोईंगने बनवलेली ही 4 चिनूक सीएच-47 हेलिकॉप्टर चंदीगडमधील हवाई दलाच्या विमानतळावर दाखल झाली आहेत. अशी एकूण 15 हेलिकॉप्टर खरेदी केली जाणार आहेत.

चिनूक हे हेव्हीलिफ्ट हेलिकॉप्टर असून अगदी उंच ठिकाणांवरही मालवाहतूक व सैनिकांच्या दळणवळणासाठी याचा वापर होणार आहे. भारताने 2015-16 मध्ये मागवलेल्या 2 हेलिकॉप्टरपैकी चिनूक हे एक आहे. दुसरे हेलीकॉप्टर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारे ‘अपाचे’ हे आहे. अपाचे देखील यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत भारतीय हवाई दलात दाखल होईल. यात एकीकृत ‘डिजिटल कॉकपिट मॅनेजमेंट सिस्टम’ आहे. तसेच ‘कॉमन एविएशन आर्किटेक्चर कॉकपिट’ आणि ‘अॅडवांस्ड कॉकपिट’ सारख्या विशेष सुविधा आहेत. या हेलिकॉप्टरमधून एकाचवेळी दारुगोळा, हत्यारे यांच्यासह सैनिकांनाही नेता येणार आहे. चिनूक हेलिकॉप्टरला रडारद्वारे पकडणेही अवघड आहे.

चिनूक जड हत्यारे, तोफांची वाहतूक करण्यास सक्षम असून 20 हजार फुटांपर्यंतच्या उंचीवर उडू शकते. जवळजवळ 10 टनांपर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले हे हेलिकॉप्टर प्रतितास 280 किमीच्या वेगाने उडू शकते. याची ऊंची 18 फूट, तर रुंदी 16 फूट आहे. या हेलिकॉप्टरला 2 पायलट चालवू शकतात. जगभरातील 26 देशांमध्ये याचा उपयोग केला जातो. आता भारताचाही या देशांच्या यादीत समावेश झाला आहे.

चंडीगडमधील भारतीय वायूदलाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या हस्ते औपचारिकपणे चिनूक हेलिकॉप्टरला वायूदलात दाखल करण्यात आले. यावेळी बोलताना एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ म्हणाले, “चिनूक हेलिकॉप्टर वायूदलाच्या अनेक मोहिमा पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरेल. फक्त दिवसाच नाही, तर रात्रीही याचा उपयोग होऊ शकतो”.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.