INS खंडेरी पाणबुडी नौदलात दाखल, सायलन्ट किलरने ताकद वाढणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांच्या प्रमुख उपस्थित शनिवारी (28 सप्टेंबर) आयएनएस खंडेरी पाणबुडी (INS Khanderi Submarine) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

INS खंडेरी पाणबुडी नौदलात दाखल, सायलन्ट किलरने ताकद वाढणार

नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांच्या प्रमुख उपस्थित शनिवारी (28 सप्टेंबर) आयएनएस खंडेरी पाणबुडी (INS Khanderi Submarine) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. आयएनएस खंडेरीमुळे नौदलाची (INS Khanderi Submarine in Indian Navy) ताकद वाढली आहे. या पाणबुडीला नौदलाची ‘सायलन्ट किलर’ असंही म्हटलं जात आहे.

आयएनएस खंडेरी पाणबुडी भारताची दुसरी स्कॉर्पियन वर्गातील पाणबुडी आहे. या पाणबुडीला पी-17 शिवालिक वर्गातील युद्धनौकेसोबत नौदलात दाखल करण्यात आलं. रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः या युद्धनौकेला हिरवा झेंडा दाखवला. आयएनएस खंडेरीच्या नौदलातील समावेशासह भारतीय नौदलाची ताकद प्रचंड वाढली आहे.


आयएनएस खंडेरीमध्ये सलग 40 ते 45 दिवसांपर्यंत प्रवास करण्याची क्षमता आहे. INS खंडेरीच्या नौदलातील प्रवेशावेळी राजनाथ सिंह यांनी आता 26/11 सारखे कारस्थान अजिबात होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

300 किलोमीटर अंतरापर्यंत शत्रूला लक्ष्य करण्याची क्षमता


नौदलातील दुसरी सर्वाधिक अत्याधुनिक पाणबुडी असलेली खंडेरी पाणबुडी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी अगदी सक्षम आहे. ही पाणबुडी किनाऱ्यावर असताना देखील जवळपास 300 किलोमीटर दूरपर्यंत शत्रूच्या जहाजाला उद्ध्वस्त करु शकते. समुद्राच्या खोलात 2 वर्षांपर्यंत चाचणी घेतल्यानंतर खंडेरी पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे.

सलग 40 ते 45 दिवसांपर्यंत प्रवास करण्याची क्षमता

खंडेरी पाणबुडी भारतीय समुद्र सीमेची सुरक्षा करण्यासाठी अगदी सक्षम आहे. ही पाणबुडी पाण्यातून कोणत्याही युद्धनौकेला उद्ध्वस्त करु शकते. खंडेरी पाणबुडी पाण्यात सलग 40 ते 45 दिवसांपर्यंत प्रवास करु शकते. देशांतर्गत निर्मिती करण्यात आलेली ही पाणबुडी प्रतितास 35 किलोमीटर वेगाने प्रवास करु शकते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *