‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’, व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाणांचं प्रेमगीत

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने घेतलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं नवं रुप पाहायला मिळालं.

'मेरे सपनो की राणी कब आयेगी तू', व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाणांचं प्रेमगीत
Follow us
| Updated on: Feb 15, 2020 | 12:02 AM

नांदेड : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने घेतलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं नवं रुप पाहायला मिळालं (Interview of Ashok Chavan by Ritesh Deshmukh). रितेशच्या अनेक प्रश्नांना अशोक चव्हाण यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. विशेष म्हणजे मुलाखतीच्या शेवटी त्यांनी आपण चांगले बाथरुम सिंगर होतो असं म्हणत गाणीही म्हटली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच अशोक चव्हाणांनी ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’ हे गाणं गायलं. यावर उपस्थित तरुणांनी जोरदार प्रतिसाद दिला. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्ताने नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची दीर्घ मुलाखत झाली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अशोक चव्हाण यांनी आराधना सिनेमातील ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी कब’ हे गाणं गायलं. त्यानंतर ‘जिंदगी कैसे हैं पहिली’ हेही गाणं गायलं. अशोक चव्हाण यांच्यानंतर स्वतः रितेश देशमुखने देखील गाणी गायली. रितेशने आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटातील ‘पल पल सोच में, तुझे मेरी कसम’ हे गाणं गायलं.

रितेश देशमुख यांनी चव्हाण दाम्पत्याची घेतलेली मुलाखत प्रश्नोत्तर स्वरुपात

रितेश देशमुख : शंकरराव चव्हाणांना हेडमास्तर म्हणत होते. वडील म्हणून ते कसे होते? अशोक चव्हाण : वडील म्हणून ते प्रेमळ होते. मला 5 बहिणी होत्या. त्यात मी लहान असल्याने त्यांचं माझ्यावर अधिक प्रेम होतं.

रितेश देशमुख : तुम्ही जिद्दी होता का? अभ्यास आवडायचा की खेळ? अशोक चव्हाण : माझा भरपूर लाड व्हायचा. हवं ते मिळत होतं. आई वडील दोघांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. ते दोघे माझा अभ्यास करून घ्यायचे. मी त्या वयात भरपूर खेळही खेळलो आहे. सर्वच बहिणींचं देखील माझ्यावर खूप प्रेम होतं. बहीण पुष्पा हिनेही माझा अभ्यास करुन घेतला.

रितेश देशमुख : वडिलांची कधी भीती वाटतं होती का? तुमचं दप्तर हरवल्यावर नाना आणि तुम्ही एका बंद खोलीत गेले होते. तिथं काय झालं? अशोक चव्हाण : आमच्या रामटेक बंगल्याच्या खोलीत तसं काही झालं नाही. शाळेत बॅग गायब झाली होती. त्यावेळी नानांनी उलट तपासणी घेतली. त्यानंतर आयुष्यात कोणतीच वस्तू हरवली नाही. तिथून मला न विसरण्याची सवय लागली.

रितेश देशमुख : तुमचे वडील मंत्री असताना काही दडपण येत होतं का? अशोक चव्हाण : मी मुंबईत शिकलो. तेळी माझ्या सहकाऱ्यांचे वडील नोकरी व्यवसाय करत होते. मात्र राजकारणात कमी होते. मुंबईत समाज जात पात मानत नाही. मुंबईत एकोपा आहे. ही त्याची शान आणि देण आहे. मुंबईने हे आगळेवेगळेपण दिलं आहे. कॉलेजमध्ये आल्यावर महेश मांजरेकर हे मित्र होते. त्यांना माझे वडील मुख्यमंत्री आहेत हे माहिती नव्हतं. आम्ही ओळख सांगितली नाही. साधेपणा जपला. नंतर हळूहळू इतरांना समजत गेलं.

रितेश देशमुख : तुमची लव्ह स्टोरी कशी जुळली? अमिता चव्हाण : प्रथम मैत्रिणीच्या माध्यमातून भेट झाली. कॉलेजची गॅदरिंग असताना मला मैत्रिणीने मला तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे असं सांगितलं. त्यावेळी मी टॉम बॉय होती. अशोक चव्हाण : तेव्हा जुळलं आणि आता सुरु आहे. अमिता चव्हाण : आमचा किस्सा ‘तेरे घर के सामने’ असा होता. ते सह्याद्रीवर असताना माझे घर समोर होते. मला त्यांना समजाऊन घ्यायला 4 वर्ष लागली. तो निस्वार्थ प्रामाणिक वाटला म्हणून मी त्याचा जोडीदार म्हणून निर्णय घेतला. आमचा प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे आहे. आता फुले देत नाही, नजरेने एकमेकांना ओळखतो. आमच्या काळात व्हॅलेंटाईन डेची क्रेझ नव्हती. अशोक चव्हाण : आयुष्यात घडणाऱ्या घटना विधिलिखित असतात. आम्ही आनंदाने राहत असून दोन मुली आहेत. सर्व व्यवस्थित आहे. अमिता चव्हाण : मी वेगळ्या समाजाची असल्याने सुरुवातीला माझ्यावर दडपण होतं. मात्र यांचं कुटुंब खूप चांगलं होतं. त्यामुळे माझं दडपण निघून गेलं.

रितेश देशमुख : शालेत असताना एकाही मुलीशी बोललो नाही. शाळेत असताना एकही मुलगी आवडली नाही. मात्र, प्रचंड त्रास झाला. आजच्या दिवशी एका मुलीला फुले पाठवली. मात्र, 20 वर्ष झाली. अजूनही उत्तर आलं नाही.

“तुझे मेरी कसम या सिनेमाच्यावेळी वडिलांची परवानगी घ्यायची होती. वर्षावर असताना वडिलांची वेळ घ्यावी लागत होती. त्यावेळी त्यांनी मला तुमचा निर्णय तुम्ही घ्या, असं सांगितलं. ते म्हणाले, सिनेमा चालला नाही, तर लोक म्हणतील मुख्यमंत्र्याच्या मुलाचा चित्रपट चालला नाही, तर तुमचं नाव खराब होईल. मी त्यावेळी माझं नाव खराब होणार नाही याची काळजी घेईन आणि तुझं नाव खराब होणार नाही याची काळजी तू घे.”

रितेश देशमुख : जेनेलिया यांची ओळख निर्मात्यांनी करुन दिली. मात्र, त्यांनी माझ्याकडे पाहिले नाही. तीन दिवस बोलल्या नाही. त्यांना वाटलं मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्यानं अॅट्युट्युड असेल. नंतर त्या बोलल्या की तुझी सुरक्षा कुठं आहे? त्यानंतर आमचं जे बोलणं सुरु झालं ते अजून सुरु आहे. ते आता थांबणार नाही. ही पत्नी 7 नाही, तर 70 जन्मी मिळो.

संबंधित व्हिडीओ:

Interview of Ashok Chavan by Ritesh Deshmukh

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.