लाल परी धावली! मात्र कुठे अल्प प्रतिसाद, तर कुठे प्रवाशांची एसटीकडे पाठ

महानगरपालिका आणि कंटेन्मेंट झोन वगळता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत ग्रामीण भागात एसटी बसची सेवा अखेर सुरु झाल्या आहेत.

लाल परी धावली! मात्र कुठे अल्प प्रतिसाद, तर कुठे प्रवाशांची एसटीकडे पाठ
Follow us
| Updated on: May 23, 2020 | 7:07 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केंद्र (Intra-district ST bus Services) सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली. सध्या या लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे गेले दोन महिने बंद असलेले लाल परीची चाकं पुन्हा धावू लागली आहेत. महानगरपालिका आणि कंटेन्मेंट झोन वगळता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत ग्रामीण भागात एसटी बसची सेवा अखेर सुरु (Intra-district ST bus Services) झाल्या आहेत. मात्र, दोन महिन्यांनी एसटी सुरु झाल्यानंतरही त्याला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

एसटी बसने प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने नियमावली जाहीर केली आहे. त्यात एका बसमध्ये फक्त 22 प्रवासी प्रवास करु शकतील. एका सीटवर फक्त एकच प्रवासी असेल, बस सॅनिटाइज केलेली असेल, तसेच प्रवाशांना सुद्धा आपले हात सॅनिटाइज करुनच तिकीट दिले जाणार आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे.

भंडाऱ्यात कालपर्यंत 1,358 जणांचा एसटीतून प्रवास

भंडारा जिल्ह्यात कालपासून एसटी बसेस धावू लागल्या आहेत. जिल्हा अंतर्गत ही सेवा सुरु झाली असून भंडारा जिल्ह्याच्या विभागीय बस स्टँडपर्यंत या बसेस जाणार आहेत.

भंडारा जिल्ह्याच्या 4 ही आगारातून 41 शेड्युलचे आयोजन करण्यात आले होते. त्या पैकी 245 बसच्या फेऱ्या पूर्ण झाल्या. या फेऱ्यांनुसार काल शेवटच्या फेरीपर्यंत 1,358 लोकांनी प्रवास केला. आजपासून 3 दिवस सुट्ट्या पडल्यामुळे कालच्या तुलनेत आज प्रवासी संख्या कमी असल्यामुळे बस फेऱ्या कमी आहेत. मंगळवारपासून यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

सोलापुरात एसटीला अल्पसा प्रतिसाद

सोलापूर शहरातून बाहेर बस जात नाही. बाहेरुन पण शहरात बस येत नाहीत. मात्र, ग्रामीण भागात बस सेवा सुरु आहे. त्याला प्रवाशांचा अल्पसा प्रतिसाद मिळतो आहे. अक्कलकोट आगारात 15 मार्गांवर 46 फेऱ्या झाल्या आहेत. इतरवेळी 513 फेऱ्या होतात. करमाळा आगारात 70 फेऱ्या झाल्या आहेत. 2 हजार 491 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. सांगोला आगारातून अकलूजसाठी चार, पंढरपूर आणि मंगळवेढा प्रत्येकी सहा फेऱ्या झाल्या आहेत. मंगळवेढा आगारातून बसच्या केवळ दोनच फेऱ्या झाल्या आहेत. मोहोळ आगारातून बसच्या केवळ तीन फेऱ्या झाल्या आहेत. कुर्डुवाडी आगारात तीन ठिकाणी नियोजित केलेले बसेस प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे रेडझोन वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरु

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कालपासून बससेवा सुरु झाल्या आहेत. रेडझोन वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 14 बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात फक्त 98 प्रवाशांनी प्रवास केला आहे. दिवसभरात फक्त 10 टक्के उत्पन्न झालं आहे. जिल्ह्यात बसेसच्या एकूण 71 फेऱ्या झाल्या आहेत (Intra-district ST bus Services).

अमरावतीतील सहा आहारात 547 बस फेऱ्या 

अमरावतीत बडनेरा वगळता परतवाडा, दर्यापूर, चांदूर रेल्वे, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार या ठिकाणी निम्या प्रवसी बस वाहतूक सुरु झाली आहे. सहा आहारात 547 बस फेऱ्या झाल्या आहेत. तर 112 चालक वाहक नियुक्त करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी बस स्थानकात एकही प्रवाशी नसल्याने बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व बस सेवा सुरु मात्र एकही प्रवासी नसल्याने लाल परी धावली नाही.

जळगावातही एसटी सेवा सुरु

एसटीच्या फेऱ्या तब्बल 60 दिवसांपासून बंद होत्या. चोपडा डेपोत एका दिवसात 620 फेऱ्या होतात तसेच, दिवस भरातून 27,620 किलोमीटर एसटीचा प्रवास होत असतो. एसटीचे दैनिक उत्पन्न 8 लाख रुपये असून प्रत्येक दिवशी 85 बसेसद्वारे 22 हजार प्रवासी प्रवास करत असतात. पण, लॉकडाऊनमुळे तब्बल 60 दिवसांपासुन एकाच जागेवर थांबलेल्या गाड्यांचे दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून त्यात वॉशिंगसह सर्व गाड्या सॅनिटाइज सुद्धा केल्या जात आहेत. गेल्या दोन महिन्यात चोपडा डेपोचे 4 कोटी 80 लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नाशिक, मालेगावातही लालपरी धावली

नाशिक, मालेगाव आणि कंटेन्मेंट झोन वगळता ग्रामीण भागात एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. लासलगाव आगारने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत लासलगाव ते मनमाड 2 फेऱ्या झाल्या आहेत. लासलगाव ते चांदवड 2 फेऱ्या तर लासलगाव ते सिन्नर 2 फेऱ्या सुरु केल्या आहेत. या एसटी बस सेवेदरम्यान सोशल डिस्टन्सिंग राखत 50 टक्के प्रवासी वाहतूक केली जाणार असून या प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. एसटी बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने प्रवासानी आनंद व्यक्त केला. ही सेवा अखंडितपणे सुरु राहावी अशी मागणी प्रवासी करत आहे.

सातारा जिल्ह्यांतर्गत एसटी धावली

सातारा जिल्हा हा नॉन रेड झोन घोषित करण्यात आला असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यांतर्गत सर्व तालुक्यातील विभागाची एसटी बस सेवा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकूण 11 विभाग असून या प्रत्येक विभागात 34 बसच्या माध्यमातून 107 फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहे. या फेऱ्यांसाठी 55 चालक आणि 55 वाहक कार्यरत आहेत.

सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत एका एसटीत 22 प्रवाशी अशी नियमावली लावुनही एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या धसक्यामुळे या एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवलेली पहायला मिळत आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या एसटीच्या फेऱ्यात एक किंवा दोन प्रवाशी बसत असल्यामुळे सातारा एसटी महामंडळाला काही दिवस याचा तोटा सहन करावा लागणार आहे.

बीडकरांची महामंडळाच्या सेवेकडे पाठ

बीड जिल्हा अंतर्गत कालपासून बससेवा सुरु करण्यात आली. 50 टक्के आसन क्षमता घेऊन म्हणजे प्रत्येक सीटवर एक प्रवासी असे 22 प्रवासी घेऊन एसटी धावण्यासाठी सज्ज असली तरी बीडकरांनी मात्र महामंडळाच्या सेवेकडे पाठ फिरवली आहे. आज दिवस भरात केवळ 3 फेऱ्या झाल्याने बीड आगार हतबल झाले (Intra-district ST bus Services) आहे.

संबंधित बातम्या :

फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह, कळंब रुग्णालयाचा कारभार

सरकारकडून येणे लिहा, पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्या, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरुच, 14 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा तीनशेच्या दिशेने

गुजरातहून नंदुरबारमध्ये परतलेल्यांना मनेरगातंर्गत रोजगार, जिल्ह्यातील 40 हजार स्थलांतरित मजुरांच्या हाताला काम

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.