अंबानींच्या लेकीच्या लग्नाला वऱ्हाडी कोण कोण?

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. ईशा आणि आनंद पीरामल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. नवरदेव आनंद पीरामल वऱ्हाडींसह अंबानींचं निवासस्थान अँटिलियावर पोहोचला आहे.  या लग्नासाठी अंबनींनी जवळपास सव्वा सातशे कोटी रुपये खर्च केला आहे. या लग्नात 600 पाहुणे येणार असल्याची माहिती आहे. यात दोन्ही कुटुंबाचे जवळचे नातेवाईक आणि […]

अंबानींच्या लेकीच्या लग्नाला वऱ्हाडी कोण कोण?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. ईशा आणि आनंद पीरामल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. नवरदेव आनंद पीरामल वऱ्हाडींसह अंबानींचं निवासस्थान अँटिलियावर पोहोचला आहे.  या लग्नासाठी अंबनींनी जवळपास सव्वा सातशे कोटी रुपये खर्च केला आहे. या लग्नात 600 पाहुणे येणार असल्याची माहिती आहे. यात दोन्ही कुटुंबाचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी असतील. या लग्नाला बॉलीवूडमधील मोठमोठे कलाकार उपस्थिती लावणार आहेत. लग्नासाठी अंबानींचं 27 मजली निवासस्थान ‘अँटिलिया’ सज्ज झालं आहे. अँटिलियामध्ये रोशनाई करण्यात आली आहे. ईशा आणि आनंदचे लग्न आज अँटिलियामध्ये होणार आहे.

लग्नाला कोणाकोणाची हजेरी?

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाला देशा-विदेशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. दोन्ही कुटुंबाच्या अगदी जवळच्या 550 ते 600 कुटुंबीआना या सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलं आहे. राजकारण, क्रीडा, सिनेसृष्टी, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील नामवंत या लग्नसोहळ्याला उपस्थित राहिल्याचे दिसते आहे. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांसह बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ आणि जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा, नव्या नवेली, दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा,अनुपमा चोप्रा, मनीष मल्होत्रा, वैभवी मर्चंट इत्यादी नामवंत उपस्थित आहेत.

लग्नसोहळ्यानंतर रात्री 8.30 वाजता आशीर्वाद समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वरातीचं स्वागत अनंत आणि मुकेश अंबानी यांच्यासह अनिल अंबानी यांनी सुद्धा केले.

वरातीसाठी जवळपास अर्धा किलोमीटर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या संपूर्ण रस्त्यावर सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सर्वसाधारण वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांसह खासगी सुरक्षा रक्षकही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांचीही मदत घेण्यात आली आहे.

लग्नानंतर रिसेप्शन सोहळे

  • गुरुवारी आनंद पिरामल यांच्या वरळी सी फेसच्या नव्या घरात पिरामल कुटुंबियांकडून डिनर आहे.
  • शुक्रवारी जिओ गार्डनला आमंत्रित पाहुण्यांसाठी रिसेप्शन सोहळा असेल
  • शनिवारी रिलायन्स एम्प्लॉयीजसाठी खास रिसेप्शन सोहळा असेल
Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.