जालन्यात स्टील कंपनीत ब्लास्ट, तीन कामगारांचा मृत्यू, आठ जखमी

जालन्यातील ओम साईराम स्टील कंपनीत (Jalna Company Blast) भीषण स्फोट झाला. या अपघातात तीन कामगारांचा भाजून मृत्यू झाला.

जालन्यात स्टील कंपनीत ब्लास्ट, तीन कामगारांचा मृत्यू, आठ जखमी
Follow us
| Updated on: Mar 05, 2020 | 11:50 PM

जालना : जालन्यातील ओम साईराम स्टील कंपनीत (Jalna Company Blast) भीषण स्फोट झाला. या अपघातात तीन कामगारांचा भाजून मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मृत तिघांचा मृतदेह जालना घाटीत शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

जालन्याच्या नवीन औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम (Jalna Company Blast) स्टील कंपनीत सळई बनविताना बॉयलरमध्ये स्फोट होऊन हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेले तीनही कामगार हे परप्रांतीय असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग, केमिकल बॅरेलच्या स्फोटांची मालिका

या अपघात आठ कामगार जखमी झाले आहेत. या जखमी कामगारांपैकी काहींवर जालना येथील रुग्णालयात, तर काहींवर औरंगाबादच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच चांदनजीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलाही गुन्हा नोंदवलेला नाही. या प्रकरणाचा अधिक तपास करुन कारवाई करणार असल्याची (Jalna Company Blast) माहिती पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांनी दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.