भांडण नवरा बायकोचं, तुरुंगवास ग्रुप अॅडमिनला

इंदूर (मध्य प्रदेश) : आतापर्यंत व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे अनेक घटना घडलेल्या आहेत. अफवा, खोट्या बातम्या, धर्म विरोधातील मेसेज यामुळे पोलिसांकडून अनेकांवर कारवाईही झाली आहे. मात्र नवरा-बायकोच्या भांडणामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला तुरुंगात जावं लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील इंदूर येथे घडली. व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशातील ही …

भांडण नवरा बायकोचं, तुरुंगवास ग्रुप अॅडमिनला

इंदूर (मध्य प्रदेश) : आतापर्यंत व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे अनेक घटना घडलेल्या आहेत. अफवा, खोट्या बातम्या, धर्म विरोधातील मेसेज यामुळे पोलिसांकडून अनेकांवर कारवाईही झाली आहे. मात्र नवरा-बायकोच्या भांडणामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला तुरुंगात जावं लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील इंदूर येथे घडली. व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मध्य प्रदेशातील ही पहिला घटना आहे, ज्यात पती आपल्या पत्नीची बदनामी करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करत होता. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पती सदस्य असल्यामुळे तो ग्रुपमध्ये आपल्या पत्नीचे अश्लील फोटो आणि मेसेज टाकत होता. मात्र ही घटना पत्नीला समजताच तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. कुणीतरी अज्ञात व्यक्ती व्हॉट्सअॅप ग्रुपवर माझ्याबद्दल अश्लील मेसेज पाठवत आहे, अशी तक्रार तिने पोलीस स्टेशनला केली. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने महिलेने थेट कोर्टात धाव घेतली. ही घटना इंदूरच्या अॅरोड्रोम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे.

कोर्टाने महिलेच्या याचिकेवर पोलिसांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीमध्ये समोर आलं की, जो ग्रुप इंदूर सोशल मीडियाच्या नावाने सुरु होता. तो ग्रुप महिलेचा पती सनी गोलियाचा नातेवाईक दुर्गेश गोलियाने तयार केला होता. दुर्गेशने महिलेलाही त्या ग्रुपमध्ये अॅड केले होते. ग्रुपमध्ये महिलेचा पती, सनी आणि तिचा दीर राजकुमार गोलियाही होते. सनीला आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा होता म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आलं आहे.

सनी गोलियाने ट्रू कॉलरवर आपल्या पत्नीचे अश्लील नाव लिहिलं होतं. यामुळे त्याच्या पत्नीला अनेक अश्लील फोन आणि मेसेज येत होते. पोलिसांच्या चौकशीमध्ये सनी आणि राजकुमार यांनी सांगितलं की, सनी आणि पीडित महिलेच्या घटस्फोटाची केस कोर्टात सुरु होती आणि तिला बदनाम करण्यासाठी इंदूर सोशल मीडिया नावाचा ग्रुप बनवून अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले जात होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *