के एल राहुल आणि सुनील शेट्टीच्या मुलीची लव्ह अफेअरची चर्चा

एकीकडे टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत असताना, के एल राहुल वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. के एल राहुलचं नाव अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलीशी जोडलं जात आहे.

के एल राहुल आणि सुनील शेट्टीच्या मुलीची लव्ह अफेअरची चर्चा

मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहुल सध्या विश्वचषकात व्यस्त आहे. शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे राहुल सध्या भारताकडून सलामीला फलंदाजीला येतो. एकीकडे टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत असताना, के एल राहुल वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. के एल राहुलचं नाव अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलीशी जोडलं जात आहे.

तसं पाहता क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या रिलेशनची चर्चा नवी नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लगीनगाठ बांधली. तर युवराज सिंहनेही हेजल कीचसोबत, झहीर खानने सागरिका घाटगेसोबत विवाह केला.

या यादीत आता के एल राहुलचं नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. ‘बॉलिवूड लाईफ’ च्या वृत्तानुसार के एल राहुल सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीला डेट करत आहे.

 

View this post on Instagram

 

…n i’m so good with that ?

A post shared by ?Kanch (@akansharanjankapoor) on

राहुल आणि अथिया दोघेही अनेकवेळा एकत्र दिसले होते. फेब्रुवारी महिन्यापासून दोघांचं प्रेमप्रकरण सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. या दोघांची कॉमन फ्रेंडने सोशल मीडियावर दोघांचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत राहुल आणि अथिया सोबत दिसतात. या दोघांची भेट आकांक्षा रंजन या कॉमन फ्रेंडने करुन दिली होती.

सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो एप्रिल महिन्यातील आहे. या फोटोवरुन चर्चेला उधाण आलं आहे. सध्या या चर्चांना दोघांकडूनही काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *