नवी मुंबईत आयुक्तांची अचानक भेट, ‘होम क्वारन्टाईन’ सदस्य घरी नसल्याने खळबळ

कामोठे परिसरातील होम क्वारन्टाईन (Kamothe home quarantine) केलेले रहिवासी घराबाहेर पडून फिरताना दिसत आहेत. घरातील तिघेही जण बाहेर येऊन फिरताना दिसले

नवी मुंबईत आयुक्तांची अचानक भेट, ‘होम क्वारन्टाईन’ सदस्य घरी नसल्याने खळबळ
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 4:48 PM

नवी मुंबई : कामोठे परिसरातील होम क्वारन्टाईन (Kamothe home quarantine) केलेले रहिवासी घराबाहेर पडून फिरताना दिसत आहेत. घरातील तिघेही जण बाहेर येऊन फिरत असल्याने, परिसरात धास्ती (Kamothe home quarantine) आहे. कामोठे परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. या कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा संभव असल्यामुळे, पनवेल महानगरपालिका प्रशासनाने या कुटुंबातील तिन्ही सदस्यांना होम क्वारन्टाईन म्हणजेच घरी राहण्यास सांगितले होते.

कोरोना संशयित क्वारन्टाईन करण्याऱ्या सदस्यांना घराबाहेर पडू न देण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, खुद्द पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख पोलिसांच्या मदतीने क्वारन्टाईन असणाऱ्या व्यक्तींच्या घरात जाऊन झडती घेण्याचे कार्य करत आहेत. आज पोलिसांना घेऊन मनपा आयुक्तांनी घरातील सदस्यांना अचानक भेट दिली होती, पण सदस्यच घरी नसल्याने मोठा गोंधळ झाला. या तिन्ही दोषी सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

विरारमध्ये दोघांना रेल्वेतून उतरवलं

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, अनेकांना याचं गांभीर्यच नसल्याचं दिसत आहे. कारण हातावर विलगीकरण अर्थात ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के (home quarantine stamp passengers deboarded) असूनही अनेकजण रेल्वेने प्रवास करत असल्याचं दिसत आहे. धक्कादायक म्हणजे आज सकाळीच दुबईवरुन मुंबईला आलेल्या दोघांनी रेल्वेने प्रवास केल्याचं समोर आलं. (home quarantine stamp passengers deboarded)

मुंबईवरुन गुजरातकडे जाणाऱ्या दोघांना विरार स्टेशनवर उतरवण्यात आलं. एक पुरुष आणि एका महिलेचा यामध्ये समावेश आहे. हे दोघेही आज सकाळी दुबईवरुन मुंबईत आले होते. हे दोघेही रेल्वेने गुजरातला जात होते.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 63 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने (corona positive in Maharashtra) वाढली आहे. काल दिवसभरात तब्बल 11 नवे रुग्ण आढळले असून, राज्यातील बाधितांची संख्या तब्बल 63 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच याबाबतची माहिती दिली. “काल दिवसभरात 11 रुग्ण वाढले. यामध्ये 10 रुग्ण मुंबईचे तर 1 पुण्याचा नवा रुग्ण आढळला आहे. यापैकी तिघांना संपर्क आल्यामुळे तर परदेशातून आलेल्या 8 जणांना लागण झाल्याची माहिती” राजेश टोपे यांनी दिली.

संबंधित बातम्या 

अज्ञान, मस्ती की आगाऊपणा, हातावर ‘क्वारंटाईन’चे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, दोघांना विरारमध्ये उतरवलं!

Reduce AC use | एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला, दिवसभरात 11 नवे कोरोना रुग्ण

 Corona | हातावर विलगीकरणाचे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, पालघरजवळ चेन खेचून ट्रेन रोखली!   

‘ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक’, नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.