कपिल शर्माला सलमानची साथ, कॉमेडी किंगचं लवकरच धडाकेबाज पुनरागमन

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच पुनरागमन करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान हा कपिल शर्माला रिलाँच करणार आहे. कपिलच्या नव्या कॉमेडी शोची निर्मिती सलमान खानची प्रोडक्शन कंपनी करणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात कपिल शर्मा लगीनगाठ बांधणार आहे. त्याच्या लग्नानंतर हा कपिलचा कॉमेडी शो पाहायला मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार सलमानची प्रोडक्शन कंपनी निर्मिती …

कपिल शर्माला सलमानची साथ, कॉमेडी किंगचं लवकरच धडाकेबाज पुनरागमन

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच पुनरागमन करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान हा कपिल शर्माला रिलाँच करणार आहे. कपिलच्या नव्या कॉमेडी शोची निर्मिती सलमान खानची प्रोडक्शन कंपनी करणार आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात कपिल शर्मा लगीनगाठ बांधणार आहे. त्याच्या लग्नानंतर हा कपिलचा कॉमेडी शो पाहायला मिळेल.

मीडिया रिपोर्टनुसार सलमानची प्रोडक्शन कंपनी निर्मिती करत असलेल्या कपिल शर्माच्या नव्या शोच्या शूटिंगला 16 डिसेंबरनंतर सुरुवात होणार आहे.

यापूर्वी कपिलच्या शोची निर्मिती स्वत: कपिल शर्माच करत होता. मात्र कपिलचा नवा शो ‘फॅमिली टाईम विथ कपिल’ची निर्मिती चॅनेलने दुसऱ्या कंपनीला दिली होती.

मिड डे या दैनिकाच्या वृत्तानुसार, कपिल शर्माच्या नवीन शोसाठी फिल्मसिटीमधील आठव्या मजल्यावर सेटही उभारला जात आहे. त्याच जागेवर कपिलने यापूर्वीचे शो केले होते.

लग्नाची धामधूम

दरम्यान, सध्या कपिल शर्माच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. 12 डिसेंबरला कपिल शर्मा त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चितरथसोबत पंजाबमधील जालंधर येथे लग्न करणार आहे. तर 14 डिसेंबरला रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे.

हा लग्नसोहळा साध्या पद्धतीने करण्याचा कपिलचा विचार होता. मात्र गिन्नी एकुलती असल्याने, तिच्या घरच्यांच्या मर्जीने लग्न धूमधडाक्यात करण्यात येणार आहे.

दरम्यान, कपिल शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवरुन गायब आहे. मात्र आता तो सलमान खानच्या मदतीने पुन्हा एण्ट्री करणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *