कर्नाटकात विश्वासमताआधी गायब एका काँग्रेस आमदाराला शोधायला 10 पथकं

कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता तयार झाल्याने अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस आणि जनता दलाच्या (सेक्युलर) आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आले आहे.

कर्नाटकात विश्वासमताआधी गायब एका काँग्रेस आमदाराला शोधायला 10 पथकं

बंगळुरु: कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता तयार झाल्याने अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस आणि जनता दलाच्या (सेक्युलर) आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आले आहे. त्यातच काँग्रेसचे एक आमदार गायब आहेत. त्यामुळे काँग्रेस जीडीएसच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कर्नाटकच्या सत्तास्थापनेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच बंडखोर आमदारांना विधानसभेत विश्वासमतासाठी हजर राहणे बंधनकारक करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले.

न्यायालयाने म्हटले, “काँग्रेसने लागू केलेला व्हिप आमदारांना लागू होत नाही. तसेच बंडखोर आमदारांना विश्वासमतात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही.” न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटक विधानसभेत आज विश्वासमत प्रस्तावावर चर्चा होत आहे. अनेक राजकीय विश्लेषक कर्नाटक सरकार पडण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. त्यातच आमदारांच्या पळवापळवीलाही वेग आला आहे.

काँग्रेसचे गायब आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांना शोधण्यासाठी सर्वच काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. पाटील यांना शेवटी रात्री 8 वाजता रिसॉर्टमध्ये पाहण्यात आले होते. आमदार पाटील यांना सर्व ठिकाणी शोधले जात आहे. या शोधमोहिमेसाठी काँग्रेसने 10 पथकं तयार केल्याचेही सांगितले जात आहे. ही पथकं सर्व संभाव्य ठिकाणांवर आमदार पाटील यांचा शोध घेत आहेत.

आमदारांचा फोनही स्विच ऑफ

गायब काँग्रेस आमदार पाटील यांचा विमानतळावरही शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा कोणताही तपास लागला नाही. त्यांच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, त्यांचा फोनही स्विच ऑफ येतो आहे. पाटील सापडतील आणि विश्वासमतही संपादन करण्यात आपल्याल यश मिळेल याबाबत काँग्रेस आशावादी आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक प्रकृति रिसॉर्टमध्ये घेण्यात आली. यात विधानसभेत विश्वासमत चाचणीला कसे सामोरे जायचे याची रणनिती ठरवण्यात आली.

बंडखोर आमदार बंगळुरला परतले

काँग्रेसते बंडखोर आमदार सुधाकर परत बंगळुरु येथे आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या मुलीला डेंगू झाला असून त्याचा उपचार करत असल्याचे म्हटले. आज होणाऱ्या विश्वासमतालाही ते विधानसभेत हजर राहणार नाहीत.

कर्नाटकचे इतर बंडखोर आमदार देखील आजच्या विश्वासमत चाचणीच्यावेळी विधानसभेत उपस्थित राहणार नाही. मुंबईतील एका हॉटलमध्ये मागील 10 दिवसांपासून हजर असलेल्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, “काँग्रेसचे राजीनामा देणारे सर्व आमदार एकत्र आहेत. तसेच सर्वजण आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे विधानसभेत जाण्याच्या प्रश्नच उपस्थित होत आहे.

कर्नाटक विधानसभेतील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेचं एकूण संख्याबळ 224 आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांची गैरहजेरी असल्यास संख्याबळ 209 वर येईल. यानुसार बहुमताचा आकडा 105 पर्यंत येतो, जो भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळवून देईल. कारण, भाजपकडे सध्या स्वतःचे 105 आमदार आहेत, तर एका अपक्षाचंही समर्थन मिळालंय. केपीजेपीचाही आमदार भाजपला समर्थन देत असल्यामुळे एकूण संख्याबळ 107 होतं, जे बहुमतापेक्षा जास्त आहे. तर दुसरीकडे विश्वासदर्शक ठरावात कुमारस्वामी बहुमत सिद्ध न करु शकल्यास भाजपचं सरकार येणं निश्चित आहे.

15 आमदार गैरहजर राहिल्यानंतरचं समीकरण

एकूण आमदार – 224

गैरहजर आमदार – 15

गैरहजेरीनंतरची एकूण संख्या – 209

बहुमत – 105

भाजप – 105

अपक्ष – 1 (भाजपला पाठिंबा)

केपीजेपी – 1 (भाजपला पाठिंबा)

भाजप+ 107

काँग्रेस-जेडीएस

कांग्रेस – 66 (विधानसभा अध्यक्षांसहित)

जेडीएस – 34

बसपा – 1

एकूण – 101

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *