Corona : कोरोना नाही, केवळ ताप, 'कस्तुरबा'तील कर्मचाऱ्यांनी पिटाळल्याचा दावा, रुग्ण निघाला 'कोरोनाग्रस्त'

रुग्णाला कस्तुरबाच्या तापाच्या वॉर्डमध्येच दाखल केले आणि नंतर त्याची पुन्हा चाचणी केली असता तो करोना पॉझिटिव्ह (Kasturba Carelessness About Corona Patient) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Corona : कोरोना नाही, केवळ ताप, 'कस्तुरबा'तील कर्मचाऱ्यांनी पिटाळल्याचा दावा, रुग्ण निघाला 'कोरोनाग्रस्त'

मुंबई : सर्दी-ताप, उलट्या यामुळे कस्तुरबामध्ये दाखल (Kasturba Carelessness About Corona Patient) झालेल्या एका रुण्गाला तुम्हाला करोनाची लागण झालेली नसून केवळ ताप आहे. त्यामुळे तुम्ही इतर रुग्णालयात दाखल व्हा, असे कस्तुरबाच्या डॉक्टरांनी लेखी लिहून दिले. मात्र, इतर रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने नातेवाईकांनी त्या रुग्णाला कस्तुरबाच्या तापाच्या वॉर्डमध्येच दाखल केले आणि नंतर त्याची पुन्हा चाचणी केली असता तो करोना पॉझिटिव्ह (Kasturba Carelessness About Corona Patient) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्षणे असलेल्यांना कोविड-19 चाचणी करण्यास सांगत असताना दुसरीकडे, मात्र सरकारी रुग्णालयांकडूनच चाचणी करण्यात चालढकल होत असल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण मुंबईतील एका रुग्णाला गेल्या तीन दिवसांपासून सर्दी, ताप खोकला आणि उलट्या होत होत्या. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात नेले. या रुग्णाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला कस्तुरबामधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोरोना नसल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर त्याला कोरोनाची चाचणी करण्याची गरज नसल्याचे लेखी लिहून दिले. तापासाठी इतर रुग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही त्याच्या नातेवाईकांना देण्यात आला.

त्याच्या नातेवाईकांनी बाहेर चौकशी केली असता त्यांना इतर रुग्णालयाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा कस्तुरबाकडेच विनंती केल्यानंतर या रुग्णाला तापाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरा पुन्हा त्याला त्रास होऊ लागल्यानंतर त्याची करोनासंदर्भातील चाचणी करण्यात (Kasturba Carelessness About Corona Patient) आली.

या चाचणीचे शनिवारी सकाळी अहवाल आले असून हा रुग्ण त्यात पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णाच्या नातेवाईकांनीच याबाबतची माहिती दिली.

सर्दी, पडसे, न्युमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी नेहमीच्या दवाखान्यात न जाता सरकारी रुग्णालयात, कोविड-19 चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी. त्यामुळे इतर दवाखाने सुरक्षित राहतील, बंद होणार नाहीत, अशी सूनचा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केली आहे.

मात्र, प्रत्यक्षात लक्षणे असतानाही रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात येत नसल्याच्या या प्रकारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या चाचणीसंदर्भातील किट्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याबाबतची दबक्या आवाजातील चर्चा या रुग्णालयांकडून ऐकायला (Kasturba Carelessness About Corona Patient) मिळत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *