पती-मुलांना ट्रकमध्ये कोंडून कासुर्डी टोलनाक्यावर गँगरेप, बारामती सत्र न्यायालयाचा मोठा निकाल

नोव्हेंबर 2012 मध्ये पीडित महिला पती आणि मुलांसह ट्रकने सोलापूरहून पनवेलला जात होती. त्यावेळी पोलिस असल्याचे भासवून आरोपींनी ट्रक थांबवला होता.

पती-मुलांना ट्रकमध्ये कोंडून कासुर्डी टोलनाक्यावर गँगरेप, बारामती सत्र न्यायालयाचा मोठा निकाल
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 1:14 PM

बारामती : पुण्यातील कासुर्डी टोलनाक्यावर सात वर्षांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. सामूहिक बलात्कार, अपहरण आणि जबरी चोरी प्रकरणी बारामती सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना आजन्म कारावास ठोठावला आहे. (Kasurdi Toll Naka Rape Baramati Court)

पुण्यातील कासुर्डी टोलनाक्याजवळ 22 नोव्हेंबर 2012 रोजी ही घटना घडली होती. पीडित महिला पती आणि मुलांसह ट्रकने सोलापूरहून पनवेलला जात होती. त्यावेळी पोलिस असल्याचे भासवून आरोपी अशोक आत्माराम येडके, गणेश सुभाष वैरागे, गौरव गंडप्पा जमादार यांनी ट्रक थांबवला.

पीडित महिलेचा पती आणि मुलांना आरोपींनी चाकूच्या धाकाने केबिनमध्ये कोंडून ठेवलं. त्यानंतर तिला ट्रकच्या पाठी नेत तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला होता. आरोपींचं क्रौर्य इतकं होतं, की एक आरोपी महिलेच्या हातांवर पाय ठेवून उभा राहिला, आणि इतरांनी तिच्यावर अत्याचार केले.

हेही वाचाडीजे लावण्यावरुन वाद, फेअरवेल पार्टीला गेलेल्या विद्यार्थ्यांना बाऊन्सरकडून मारहाण

बारामतीचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. कलम 376 2 (जी) आणि 394 नुसार तिन्ही आरोपींना आजन्म कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा आरोपींना भोगावी लागणार आहे.

आरोपींनी याआधीही टोलनाक्यावर लूटमार केल्याचं पोलिस तपासात समोर आलं. लुटलेल्या व्यक्तीचं ओळखपत्र घटनास्थळी टाकून त्याला आरोपी भासवण्याचा प्रयत्न करायचा, ही आरोपींची मोडस ऑपरेंडी असल्याचं तपासात निष्पन्न झालं. (Kasurdi Toll Naka Rape Baramati Court)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.