मोदींसोबत डिनर करायचा आहे, कतरिनाची इच्छा

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सामान्य जनताच नाही तर बॉलिवूड कलाकारांमध्येही मोदींची क्रेझ पाहायला मिळते. मोदींच्या चाहत्यांच्या यादीत आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. कतरिनाने मोदींसोबत डिनरवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने तिची ही …

मोदींसोबत डिनर करायचा आहे, कतरिनाची इच्छा

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सामान्य जनताच नाही तर बॉलिवूड कलाकारांमध्येही मोदींची क्रेझ पाहायला मिळते. मोदींच्या चाहत्यांच्या यादीत आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. कतरिनाने मोदींसोबत डिनरवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने तिची ही इच्छा सांगितली. महत्त्वाचं म्हणजे कतरिनाने अभिनेता सलमान खान समोर ही इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत कतरिनाला कुठल्या तीन लोकांसोबत डिनर करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने नरेंद्र मोदी, मर्लिन मुनरो आणइ कोंडोलेजा राईस यांची नाव घेतली. तिला या तिघांसोबत डिनरवर जायला आवडेल असं कतरिना म्हणाली. यावेळी कतरिनासोबत अभिनेता सलमान खानही होता.

कतरिनाने घेतलेल्या तिन्ही नावांमध्ये सलमानचं नाव नव्हतं. त्यामुळे यामध्ये सलमान खान कुठे फीट होऊ शकतो का, असा प्रश्न सलमानने कतरिनाला केला. त्यावर ‘सलमान खान डिनरसाठी बाहेर जात नाहीत’, असं उत्तर कतरिनाने दिलं.

कतरिनासोबत डिनरवर का नाही याचं कारणही सलमानने स्पष्ट केलं. ‘कतरिना साधारणपणे संध्याकाळी 6 वाजता डिनर करते जो माझा लंच टाईम असतो’, असं सलमान म्हणाला. तसेच, डिनर करताना मी केवळ तीन लोकांसोबत कम्फर्टेबल आहे, आय, मी आणि मायसेल्फ, असं सलमानने सांगितलं. यावर तू मदर तेरेसा, गांधीजी आणि नेहरुंसोबत डिनर कर, असा सल्ला कतरिनाने सलमानला दिला. तेव्हा ‘मी त्या सर्वांना भेटील पण त्याला अजून बराच वेळ आहे’, असं उत्तर सलमानने दिलं.

हे दोघे त्यांच्या आगामी ‘भारत’ सिनेमाचं प्रमोशन करण्यात सध्या व्यस्त आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या रियालिटी शोला भेट देत आहे. माध्यमांना मुलाखती देत आहेत.

सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा कोरियन सिनेमा ‘अॅन ऑड टू माय फादर’ चा रिमेक आहे. अतूल अग्निहोत्रीच्या रील लाईफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड आणि भूषण कुमारच्या टी-सीरीजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमाही सलमान खानच्या इतर सिनेमांप्रमाणे ईदला म्हणजेच 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे, तर त्याच्याशिवाय या सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेत्री तब्बू, अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेत्री दिशा पटाणी, अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता सुनील ग्रोवर दिसणार आहेत. या सिनेमात सलमान खान पहिल्यांदा एका वृद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *