‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, तेच त्या पदासाठी लायक आहेत. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होतील, त्यांनी तसं दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी मिशनचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी दिली.

'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील'
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 5:17 PM

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, तेच त्या पदासाठी लायक आहेत. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होतील, त्यांनी तसं दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी मिशनचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari on Uddhav Thackeray and Devendra Fadnavis) यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. किशोर तिवारी (Kishor Tiwari on Uddhav Thackeray and Devendra Fadnavis) यांनी आपल्या मागणीचं पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाठवलं आहे. किशोर तिवारी हे भाजपमध्ये होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश केला.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुरु असताना, किशोर तिवारी यांनी त्याबाबत आपली भूमिका व्यक्त केली.

किशोर तिवारी म्हणाले, “सध्याच्या सत्तासंघर्षात नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी. भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या एकाधिकारशाहीमुळे युतीत तिढा निर्माण झाला आहे. संजय राऊत जे बोलत आहेत ते खरं आहे. शिवसेनेला दिलेला शब्द भाजपने पाळावा. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होतील, त्यांनी तसं दाखवून दिलं आहे”.

किशोर तिवारी भाजपमधून शिवसेनेत

महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री दर्जा असेलेले, शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (Kishor Tiwari left BJP) यांनी सप्टेंबर महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी दिली. किशोर तिवारी (Kishor Tiwari left BJP) यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेचं काम करण्याचा निर्णय घेतला.

“भाजपमध्ये मेगाभरती झाली, पण कचरा आला आहे. मुख्यमंत्री सोडल्यास भाजपचे नेते प्रामाणिकपणे काम करत नाहीत, मला विधानपरिषद आमदार करण्याचा शब्द भाजपने पाळला नाही. त्यामुळे भाजपपासून लांब जातोय, आता शिवसेनेसाठी काम करणार” असं शेतकरी नेते किशोर तिवारी त्यावेळी म्हणाले होते.

कोण आहेत किशोर तिवारी?

  • किशोर तिवारी हे राज्याच्या स्वाभिमानी शेतकरी मिशनचे अध्यक्ष आहेत
  • त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे.
  • तिवारी हे संघाचे स्वयंसेवक आहेत
  • त्यांनी शेतकऱ्यांसाठी विदर्भात काम केलं आहे
  • आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली
  • 17 सप्टेंबर 2019 रोजी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

संबंधित बातम्या 

विदर्भात भाजपला धक्का, राज्यमंत्री दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी पक्ष सोडला  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.