कोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली हे संपूर्ण गाव या महापुरात 15 दिवस पाण्याखाली गेलं होतं.

कोल्हापुरात 15 दिवस महापुरात बुडालेल्या गावाला धडा, पावसाळ्यापूर्वी स्थलांतराला सुरुवात
Follow us
| Updated on: May 29, 2020 | 4:56 PM

कोल्हापूर : गेल्यावर्षी आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Chikhali Villagers Migration) कोट्यावधीचं नुकसान झालं. या पुरात सर्वाधिक नुकसान झालं ते प्रयाग चिखली या गावाचं. कारण, हे अख्ख गाव 15 दिवस पुराच्या पाण्यानेने वेढलेलं होतं. चिखली ग्रामस्थांनी या महापुरातून चांगलाच धडा घेतला असून यावर्षी पावसाळा सुरु होण्याआधीच त्यांनी शासनाने दिलेल्या जागी स्थलांतरित होण्यास सुरुवात केली आहे. कोणाचं घराचं बांधकाम पूर्णत्वाकडे आलं आहे. तर कोणी जनावरांसाठी शेड उभं करत (Kolhapur Chikhali Villagers Migration) आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात (Kolhapur Flood 2019) कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात महापुरानं थैमान घातलं. अनेक घरं, शेकडो एकर शेती, हजारो जणांवरांचं यात नुकसान झालं. विशेषतः नदीकडेला असणारी गावं पुराच्या पाण्यानं वेढली गेली. त्यामुळे गावातील लोकांना सुरक्षित बाहेर काढताना जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली.

Kolhapur Chikhali Villagers Migration

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली हे संपूर्ण गाव या महापुरात 15 दिवस पाण्याखाली गेलं होतं. तीन नद्यांच्या संगमावर हे गाव असल्याचा हा परिणाम होता.

खरंतर 1989 आणि 2005 मध्येही गावात पूर आला होता. मात्र, मागच्या वर्षीच्या महापुराची भयानकता थरकाप उडवणारी होती. 1989 च्या महापुरानंतर हे गाव स्थलांतरित करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आणि या कामासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आपली सोनतळी इथली 110 एकर जमीन शासनाच्या ताब्यात दिली. या जमिनीवर गाव वसवण्याचा प्लॅन करुन जमिनीचं वाटप देखील झालं (Kolhapur Chikhali Villagers Migration). मात्र, मूळ गावात असलेली शेती आणि कौटुंबिक अडचणी यामुळे अनेकांनी मिळालेल्या जागेत न जाणं पसंत केलं. काहींनी तर या जागाच विकून टाकल्या आणि याचा गंभीर परिणाम चिखलीकरांना गेल्यावर्षी भोगावा लागला.

Kolhapur Chikhali Villagers Migration

गेल्यावर्षी महापुराची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने या सर्वांना स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, ग्रामस्थांनी त्याला स्पष्ट नकार दिला. शेवटी त्यांना याचा भनायक परिणाम भोगावा लागला. मात्र, गेल्यावर्षी आलेल्या अनुभवातून चिखलीकरांनी चांगलाच धडा घेतला आहे. महापूर ओसरताच सोनतळी इथं मिळालेल्या जागेत घर बांधण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. आता इथे काही घरं बांधून पूर्ण झाली आहेत. तर अंतिम टप्प्यात असलेल्या घराची काम पूर्ण करुन घेण्यासाठी लगबग सुरु आहे. कोणी स्वतःसाठी घर, तर कुणी जनावरांसाठी निवारा करण्याची धडपड करत आहे. यावर्षी पुराची वाट न पाहता पावसाळा सुरु होण्याआधीच स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत इथले लोक आहेत.

Kolhapur Chikhali Villagers Migration

यावर्षी दुर्दैवान महापूर आला तरी कोरोना संकटामूळे पै पाहुणे आसरा देतील का याची शाश्वती नाही. मदतीची तर अपेक्षाही करता येणार नाही. प्रशासन आपली जबाबदारी पार पाडले पण हे सर्व होण्याआधीच काळजी घेतली, तर ती सर्वांसाठी फायद्याची ठरणार आहे. म्हणूनच चिखलीकरांनी केलेली तयारी कौतुकास्पदच म्हणावी लागेल (Kolhapur Chikhali Villagers Migration).

संबंधित बातम्या :

पंचगंगा 31 फुटांवर, 42 बंधारे पाण्याखाली, कृष्णेनेही पात्र सोडलं, सांगली-कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती

Kolhapur Flood : छातीपर्यंत पाणी, 51 हजार नागरिकांचं स्थलांतर, आर्मी, नेव्ही कोल्हापुरात

कृष्णा नदी 32 फुटांवर, पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, सांगली-कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.