दिवसभरातील मोठ्या बातम्या 14/02/2019

8 जवान शहीद जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला, 8 जवान शहीद, जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली अण्णांची प्रकृती खालावली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी नगरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल, उपोषणामुळे अण्णांना अशक्तपणा, रक्त प्रवाहावरही परिणाम पुण्यात कृषी आयुक्त कार्यलयाला टाळे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी आयुक्त कार्यलयाला टाळे ठोकले, पीक […]

दिवसभरातील मोठ्या बातम्या 14/02/2019
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
8 जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला, 8 जवान शहीद, जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

अण्णांची प्रकृती खालावली

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी नगरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल, उपोषणामुळे अण्णांना अशक्तपणा, रक्त प्रवाहावरही परिणाम

पुण्यात कृषी आयुक्त कार्यलयाला टाळे

बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी आयुक्त कार्यलयाला टाळे ठोकले, पीक विम्याच्या पैसे मिळावेत, दुष्काळी भागात उपाययोजना करा आणि हमीभाव द्या अशा प्रमुख मागण्या, कार्यालयाला टाळे लावून आयुक्तांच्या केबिनबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

प्रकाश आंबेडकरांना 4 जागा अमान्य

आघाडीच्या चार जागांच्या प्रस्तावाला प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रतिसाद नाही, दलित मतांची विभागणी टाळण्यासाठी आंबेडकरांना आघाडीत घेण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न. मात्र या प्रयत्नांना आंबेडकर प्रतिसाद देत नसल्याची माहिती. 12 जागांच्या मागणीवर आंबेडकर ठाम. आंबेडकरांना स्वतंत्र निवडणूक लढवून भाजपाला मदत करायची असल्याची काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांना शंका

राष्ट्रवादीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक, अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते हजर, शरद पवार थोड्याच वेळात बैठकीला येणार

नांदेडमध्ये आघाडीची सभा

20 फेब्रुवारी रोजी नांदेडला शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आघाडीची जाहीर सभा

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू बकरला अटक

मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू बकर याला अटक करण्यात आली आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट आणि हँड ग्रेनेडचे हल्ले झाले होते. 12 ठिकाणी घटना घडल्या होत्या. या प्रकरणात गँगस्टर दाऊद इब्राहिमसह अनेक जण वाँटेड आहेत. अबू बकरही 1993 सालापासून वाँटेड होता. बॉम्बस्फोट केल्यानंतर एके 47 रायफल नष्ट करण्याचं काम अबू बकर याने केलं होतं. पनवेल येथील खाडीत नेऊन एके 47 रायफली त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अबू बकरला गुन्हेगार हस्तांतरण कायद्यानुसार मुंबई आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शिर्डीत विद्यार्थ्यांचं उपोषण

शिर्डी – शिक्षकाची बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक, संगमनेर तालुक्यातील अकलापूर आश्रमशाळेच्या तीनशे विद्यार्थ्यांचं उपोषण, अकलापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन, शाळा अधीक्षक यांची झालेली बदली रद्द करावी या मागणीसाठी आंदोलन

नवी दिल्ली

दिल्लीत नरैना भागात अग्नीतांडव, फायर ब्रिगेडच्या 29 गाड्या घटनास्थळी, काचेची इमारत असल्यानं आग विझवण्यात अडचणी

कॅग रिपोर्ट

मोदींची राफेल खरेदी स्वस्तातीलच, कॅगच्या अहवालाने मोदी सरकारला दिलासा, जवळपास तीन टक्के स्वस्तात राफेल खरेदी केल्याचं नमूद

पवारांच्या घरी विरोधकांची बैठक

शरद पवारांच्या घरी विरोधकांची निवडणूकपूर्व आघाडीसाठी बैठक, तर मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, संसदेत मुलायमसिंहांचं वक्तव्य

विरोधक एकवटले

मोदींना हटवण्यासाठी विरोधक एकवटले, पवारांच्या दिल्लीतल्या घरी बैठक https://t.co/hz9IfCt3sz

— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2019

माढ्यातून पवार लढणार

शरद पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार, मात्र, स्थानिक आमदार बबन शिंदेची नाराजी

माढ्यात पवार!

माढ्यातून शरद पवार जवळपास निश्चित!https://t.co/UKfArdhVJy

— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2019

राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पावसाची हजेरी

#नवीदिल्ली – राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पावसाची हजेरी https://t.co/zrRTCS1ka0 pic.twitter.com/t6fs0wsiC0

— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2019

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.