Corona Updates: महाराष्ट्रात दिवसभरात 1276 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 22,171 वर

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 22 हजार 171 झाली आहे. दिवसभरात नवीन 1 हजार 278 कोरोना रुग्णांची नोंद झाली झाली आहे (Latest Corona Updates of Maharashtra ).

Corona Updates: महाराष्ट्रात दिवसभरात 1276 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 22,171 वर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 22 हजार 171 झाली आहे. दिवसभरात नवीन 1 हजार 278 कोरोना रुग्णांची नोंद झाली झाली आहे (Latest Corona Updates of Maharashtra ). राज्यात आज 399 कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात 4 हजार 199 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण 2 लाख 38 हजार 766 नमुन्यांच्या कोरोना चाचणी झाल्या आहेत. त्यापैकी 2 लाख 15 हजार 903 जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर 22 हजार 171 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 44 हजार 327 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 14 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 53 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या 832 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये 19 रुग्ण मुंबईमधील, पुण्यातील 5, जळगाव शहरातील 5,धुळे शहरातील 2, धुळे ग्रामीण भागातील 1, पिंपरी चिंचवडमधील 1, अहमदनगरमधील 1, औरंगाबाद शहरातीस 1, नंदूरबार 1, सोलापूर शहर 1 तर वसई विरारमधील एका रुग्णाचा समावेश आहे. मालेगाव शहरातील 14 मृत्यू हे 27 एप्रिल ते 10 मे 2020 या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एका रुग्णाचा आज मुंबईत मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 33 पुरुष, तर 20 महिला आहेत. आज झालेल्या 53 मृत्यूंपैकी 19 जण 60 वर्षे किंवा त्यावरील वयाचे रुग्ण आहेत, तर 30 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 जण 40 वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत 17 जणांची माहिती मिळालेली नाही. उर्वरित 36 रुग्णांपैकी 27 जणांमध्ये (75 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1237 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 12 हजार 768 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 55.61 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई84524558844899
पुणे (शहर+ग्रामीण)2814213406872
ठाणे (शहर+ग्रामीण)47935181561270
पालघर 74702965126
रायगड58402741106
रत्नागिरी71247127
सिंधुदुर्ग2461725
सातारा133776948
सांगली43025111
नाशिक (शहर +ग्रामीण)52162935225
अहमदनगर (शहर+ग्रामीण)58035715
धुळे124870462
जळगाव 42362420278
नंदूरबार 197839
सोलापूर32141692296
कोल्हापूर 92073212
औरंगाबाद65682788294
जालना71938024
हिंगोली 2942501
परभणी128834
लातूर 42522922
उस्मानाबाद 26418612
बीड142953
नांदेड 39424214
अकोला 1662119986
अमरावती 69045130
यवतमाळ 33823511
बुलडाणा 31816913
वाशिम 120823
नागपूर1719129615
वर्धा 17131
भंडारा91770
गोंदिया 1671042
चंद्रपूर110630
गडचिरोली73601
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)113025
एकूण2,06,6191,11,7408,822

संबंधित बातम्या :

पुण्यात हडपसरमध्ये 5 दिवसांचा जनता कर्फ्यू, तर कंटेनमेंट झोनमधील झोपडपट्ट्यांमध्ये 6 दिवस संपूर्ण लॉकडाऊन

पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 174 वर, अंमळनेर शहरात शंभरीपार रुग्ण

Latest Corona Updates of Maharashtra

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *