देशात 1 कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्यांची गरज, आपल्याकडे उपलब्ध… : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य, परराष्ट्रीय आणि गृह मंत्रालयाने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांंनी देशातील उलब्ध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांबाबत (Hydroxychloroquine tablets) महत्त्वपूर्ण माहिती दिली.

देशात 1 कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्यांची गरज, आपल्याकडे उपलब्ध... : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
Follow us
| Updated on: Apr 10, 2020 | 7:52 PM

नवी दिल्ली : “देशात सध्या 1 कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (Hydroxychloroquine tablets) गोळ्यांची गरज आहे. मात्र, आपल्याजवळ 3.28 कोटी गोळ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे काही अतिरिक्त औषधे निर्यात करण्यात येणार आहे”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय आरोग्य, परराष्ट्रीय आणि गृह मंत्रालयाने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी लव अग्रवाल यांनी माहिती दिली (Hydroxychloroquine tablets) .

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन काय आहे?

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळ मलेरियावरील औषध आहे. मलेरियाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या गोळया दिल्या जातात. पण सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. भारतात मोठया प्रमाणावर या औषधाची निर्मिती केली जाते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमेरिकेला तातडीने या औषधांची गरज आहे. मागच्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवली आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6412 वर

दरम्यान, “देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आतापर्यंत 6412 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 199 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 33 जणांचा मृत्यू गेल्या 24 तासात झाला आहे. तर 503 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देश कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजवर गेलेला नाही. मात्र, काळजी घेणं जरुरीचं आहे”, अशी माहिती लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

“देशभरात आतापर्यंत 16,002 लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी 2 टक्के लोकांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली. कोरोनासाठी 146 सरकारी प्रयोगशाळांना आणि 67 खाजगी प्रयोगशाळांना टेस्टची अनुमती देण्यात आली आहे”, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

“आम्ही काल 20, 473 नागरिकांना विदेश नागरिकांना देशाबाहेर काढलं. ही प्रक्रिया सुरुच राहणार आहे”, असं परराष्ट्रीय मंत्रालयाचे एएस आणि समन्वयक दम्मू रवी म्हणाले. तर सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. पुण्य सलिला श्रीवास्तव यांची काल सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

संबंधित बातम्या :

सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान यांना सहलीसाठी पत्र दिलं? : राधाकृष्ण विखे पाटील

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा करा, आरोग्यमंत्र्यांची केंद्र शासनाकडे मागणी

दोन परिचारिकांना ‘कोरोना’, दादरचे शुश्रुषा रुग्णालय सील करण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.