अहमदनगर महापालिका निवडणुकीत दारुचा महापूर

अहमदनगर : अहमदनगरला महापालिका निवडणुकीत दारूचा महापूर पहिला मिळतोय. नगर शहराजवळ परराज्यातील दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय. तर अनेकभागात छापा टाकून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महापालिका निवडणूक पार्श्‍वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. नगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगर शहराजवळ राज्यात प्रतिबंधीत असलेल्या मद्याचा मोठा साठा जप्त केला. […]

अहमदनगर महापालिका निवडणुकीत दारुचा महापूर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

अहमदनगर : अहमदनगरला महापालिका निवडणुकीत दारूचा महापूर पहिला मिळतोय. नगर शहराजवळ परराज्यातील दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय. तर अनेकभागात छापा टाकून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महापालिका निवडणूक पार्श्‍वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.

नगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगर शहराजवळ राज्यात प्रतिबंधीत असलेल्या मद्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत 4 चाकीचार वाहने आणि दारु साठा असा सुमारे 24 लाख 41हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 4 आरोपींना अटक केली आहे. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीत दारुचा वापर रोखण्याच्या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

अहमदनगर महापालिका निवडणूक विविध कारणांमुळे चर्चेत आहे. त्यातच गुन्हेगारीही चर्चेचा विषय बनली आहे. शहरात दारुचं आमिष दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलं जात असल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालंय. मतदारांना प्रलोभनं दाखवणं हा गुन्हा आहे. पण उमेदवार याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय.

अहमदनगर आणि धुळे महापालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 10 तारखेला निकाल लागणार आहे. दोन्ही महापालिकांमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यातील महापालिकांमध्ये विजयाचा सपाटा लावलेल्या भाजपला या निवडणुकीतही मतदार साथ देतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.