LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

शरद पवार उद्या बारामतीच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील पूरस्थितीची माहिती घेतली, सकाळी फोनवरुन पूरस्थितीचा आढावा, प्रशासन, पदाधिकारी यांनी दाखवलेल्या दक्षतेबद्दल कौतुक, शरद पवार उद्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

27/09/2019,9:37AM
Picture

जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

27/09/2019,8:58AM
Picture

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सातारा बंदची हाक

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ आज सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

27/09/2019,8:02AM
Picture

शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात हजर होणार

27/09/2019,7:56AM
Picture

कल्याणमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याचा मनसेत प्रवेश

निवृत्त एसीपी जगदीश लोहाळकर यांनी काल (26 सप्टेंबर) मनसे सरचिटणीस माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या उपस्थित मनसेत प्रवेश केला. लोहाळकर कल्याण पूर्वेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात दबंग म्हणून ते प्रसिद्ध होते. एसीपी पदावरुन लोहानकार हे सेवानिवृत्त झाले होते. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी ते इच्छुक असल्याने प्रस्थापितांची डोकेदुखी वाढणार आहे.

27/09/2019,7:53AM
Picture

पुणे का बुडाले ? सामनातून भाजपवर टीका

पुणे का बुडाले ? असा प्रश्न करत सामनाने भाजपावर निशाण साधला आहे. पुणे नगरपालिकेत, राज्यात आणि केंद्रात एक हाती सत्ता असतांना पुण्यात असते का घडले ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई जर तुंबापुरी होते, तर पुण्यात आराम खुर्चीवर बसून टिका करणाऱ्यांवर सामनातून निशाणा साधण्यात आला.

27/09/2019,7:49AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *