LIVE : सत्तास्थापनेचा दावा शनिवारी? संजय राऊत यांचे संकेत

 

LIVE : सत्तास्थापनेचा दावा शनिवारी? संजय राऊत यांचे संकेत
Picture

सत्तास्थापनेचा दावा शनिवारी?

सत्तास्थापनेचा दावा शनिवारपर्यंत करण्यात आता कुठलेही अडथळे नाहीत, शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती

21/11/2019,2:21PM

 

Picture

उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल, शिवसेनेकडून जंगी स्वागत

21/11/2019,1:14PM
Picture

किमान समान कार्यक्रम पाहून निर्णय घेऊ : राजू शेट्टी

सांगली – भाजपने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे, त्यामुळे भाजपला बाजूला सारून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार व्हावं अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पण भूमिका आहे.मात्र कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगारी याविषयी काय मुद्दे आहेत, हे बघून आम्ही यात सहभागी व्हायचा की नाही हे नंतर जाहीर करु – माजी खासदार राजू शेट्टी.

21/11/2019,12:34PM
Picture

नाशिक पालिका मनसे नगरसेवक राज ठाकरेंच्या भेटीला

नाशिक पालिका मनसे नगरसेवक राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिकमध्ये महापौरपदाचा पेच, भाजप आणि सेनेकडून या निवडणुकीसाठी मनसे नगरसेवकांना विचारणा झाली आहे. मनसे नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे , आज राज ठाकरे यावर निर्णय देणार

21/11/2019,10:16AM
Picture

आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सुजवून फुगवून पाठवू : अब्दुल सत्तार

राजकीय घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे, दोन दिवसांत सत्ता स्थापन होईल. आमदार फोडले तर आम्ही रुग्णालयात पाच रुम बूक केल्या आहेत. आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सुजवून फुगवून पाठवू, अँम्ब्युलन्स आणि रुग्णालयात बुकींग केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा कोणताही आमदार फुटणार नाही, उदयनराजेंची काय स्थिती झाली सगळ्यांनी पाहिली आहे. सहकारमंत्री चुकीने म्हणाले की भाजपशिवाय सरकार बनू शकत नाही, खरं तर त्यांच्या शिवायही सरकार बनू शकतं. शिवसेनाच सरकार स्थापन करणार

21/11/2019,10:16AM
Picture

सरसंघचालक मोहन भागवत नाशिक दौऱ्यावर

नाशिक – सरसंघचालक मोहन भागवत आजपासून चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर, भागवत यांचा उपस्थितीत वेगवेगळ्या बैठकांचा आयोजन, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील विविध श्रेणीतल्या कार्यकर्त्यांना बैठकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार, सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भागवतांच्या नाशिक दौऱ्याला महत्व

21/11/2019,10:15AM
Picture

कोल्हापुरात ऊसदर आंदोलन चिघळले

शिरोळ आणि हातकंणगले तालुक्यात उसदराचे आंदोलन चिघळले, कर्नाटकमधील कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनास हिंसक वळण, दानोळी येथे अथणी शुगर्सचा १ ट्रॅक्टर पेटवला, सहा ट्रॅक्टरमधील हवा सोडून ऊसवाहतूक रोखली, आळते ता. हातकंणगले येथे व्यकंटेश्वरा कारखान्याची दोन ट्रॅक्टरचे हवा सोडून ऊसवाहतूक रोखली.

21/11/2019,10:23AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *