LIVE : मी भाजप सोडणार नाही: पंकजा मुंडे

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज

LIVE :  मी भाजप सोडणार नाही: पंकजा मुंडे
Picture

बारामतीची पालखी वाहणार नाही, पण चंद्रकांतदादा तुम्ही त्रास देता हे मान्य करा : महादेव जानकर

12/12/2019,2:26PM
Picture

पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे

12/12/2019,2:25PM
Picture

मुंडेंच्या निधनानंतर खचून न जाता पंकजांनी कुटुंबाला समर्थपणे सावरलं : चंद्रकांत पाटील

12/12/2019,2:23PM
Picture

एकनाथ खडसे यांचं भाषण

तुम्ही आम्हाला कितीही छळलं, तरी आम्ही तुमच्यासोबतच राहणार, याचा अर्थ तुम्हाला कोणीतरी छळतंय, हे मी नाही म्हणत जानकर म्हणतायेत, ते का राहतायेत? तर मुंडेसाहेबांच्या प्रेमापोटी – खडसे

12/12/2019,1:53PM
Picture

तुम्ही त्रास देता हे मान्य करा - महादेव जानकर

12/12/2019,1:45PM
Picture

भाजपसाठी गोपीनाथ मुंडे दैवत आहेत - बबनराव लोणीकर

12/12/2019,1:38PM
Picture

प्रीतम मुंडे यांच्याकडून मान्यवरांचं स्वागत

12/12/2019,1:34PM
Picture

एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये चंद्रकांत पाटील आसनस्थ

12/12/2019,1:25PM
Picture

चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पंकजा मुंडे समर्थकांची घोषणाबाजी

12/12/2019,1:17PM
Picture

पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल

12/12/2019,1:09PM
Picture

पंकजा मुंडे गोपीनाथ गडाकडे रवाना

12/12/2019,12:49PM
Picture

पंकजा मुंडेताई कोणताही राजकीय भूकंप करणार नाहीत- पाशा पटेल

पंकजा मुंडेताई कोणताही राजकीय भूकंप करणार नाहीत. त्या भाजप सोडणार नाहीत. आज ताई फक्त कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. पराभवनंतर त्या पहिल्यांदा समोर येत आहेत. काही मतभेद असतील पण सोडवलं जाईल असं वाटतं – पाशा पटेल

12/12/2019,12:41PM
Picture

चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांची बंद दाराआड चर्चा

12/12/2019,11:57AM
Picture

नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का?

12/12/2019,10:52AM
Picture

आधी 26 वर्षांनी भेट, आता थेट पक्षप्रवेश, अनिल गोटेंचं कट्टर विरोधक शरद पवारांना बर्थडे गिफ्ट!

12/12/2019,10:52AM
Picture

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नाराज : अनिल गोटे

12/12/2019,10:05AM
Picture

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

12/12/2019,10:04AM
Picture

आजचा दिवस आनंदाचा - अजित पवार

12/12/2019,10:04AM
Picture

सुप्रिया सुळे यांच्या शरद पवारांना शुभेच्छा

12/12/2019,9:51AM
Picture

VIDEO : स्पेशल रिपोर्ट | वाघिणीचा संघर्ष : पंकजा मुंडे यांच्या धगधगत्या कारकिर्दीचा आढावा

12/12/2019,9:48AM
date=”12/12/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] माजी मंत्री आणि भाजपचा ओबीसी चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे आज परळीत येणार नाहीत [/svt-event]

Picture

माजी शिवसेना आमदार शशिकांत खेडेकर

गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम आहे म्हणून त्यांच्या भेटीसाठी आलो आहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि obc नेते बोलत आहेत म्हणजे काहीतरी अन्याय असेल तो दूर झाला पाहिजे. पंकजा मुंडे काही मोठी राजकिय भूमिका घेतील असं वाटत नाही, पण त्या जे काही बोलतील ते चांगलंच असेल.

12/12/2019,9:45AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *