LIVE : पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण

LIVE : पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण
Picture

पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण

बुलडाणा : पालकमंत्री मदन येरावार यांना अखेर शहीद जवानाच्या कुटुंबीयांची आठवण, शहीद जवानाच्या घरी मदन येरावार यांची सांत्वनपर भेट, येरावार यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांची साधी विचारपूसही केली असल्याचे ‘टीव्ही 9 मराठी’ने दाखवलेले वृत्त

10/05/2019,3:15PM
Picture

चंद्रकांत पाटलांचं पवारांना आव्हान

सोलापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. जाणता राजांनी चौकात चर्चा करावी, दुष्काळ योजनेची आकडेवारी संदर्भात चर्चा कराण्यास तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दुष्काळाचा फायदा घेत काहीजण राजकीय स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात आहेत, असं टीकास्त्र चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर सोडलं. ते सोलापुरात बोलत होते.

10/05/2019,2:57PM
Picture

काँग्रेसची बैठक, विखे पाटील गैरहजर

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी काँग्रेसची मुंबईत बैठक, बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित, वैयक्तिक कारणाणुळे राधाकृष्ण विखे पाटील बैठकीला गैरहजर

10/05/2019,11:21AM
Picture

भिवंडीत प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरात सशस्त्र दरोडा

प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरात सशस्त्र दरोडा, दानपेटी फोडून लाखो रुपयांची चोरी, परिसरात खळबळ

10/05/2019,9:16AM
Picture

नागपुरात कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमध्येच Tik Tok व्हिडीओ

नागपुरात कुख्यात गुंडाने पोलीस व्हॅनमध्येच Tik Tok व्हिडीओ बनवला, व्हिडीओ व्हायरल, पोलीस दलात खळबळ, शासकीय वाहनाचा गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

10/05/2019,8:44AM
Picture

पालघरमध्ये अल्फा मेटल कंपनीच्या मालकाचे अपहरण

पालघरमध्ये अल्फा मेटल कंपनीच्या मालकाचे अपहरण, दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने परिसरात खळबळ, पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

10/05/2019,8:11AM
Picture

ठाण्यातील ढोकाली नाका येथे सफाई करताना 3 कामगारांचा गुदमरुन मृत्यू

ठाण्यातील ढोकाली नाका येथे सफाई करताना 3 कामगारांचा गुदमरुन मृत्यू, 8 जण काम करत होते, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात यश, उर्वरित कामगारांवर उपचार सुरु

10/05/2019,7:45AM
Picture

कोल्ड स्टोअरेजच्या नावाखाली चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा

कोल्ड स्टोअरेजच्या नावाखाली चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई, गोमांस तस्करीचा संशय, 35-40 जनावरे ताब्यात

10/05/2019,7:42AM
Picture

बेळगाव-गोवा महामार्गावर अपघातानंतर वाहनांना आग

बेळगाव-गोवा महामार्गावर अपघातानंतर वाहनांना आग, चिखले फाट्याजवळील अपघात, 2 जण जखमी, वाहने जळून खाक

10/05/2019,7:38AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *