ज्याने लग्न लावलं, त्याच्यासोबत नवरी पळून गेली

भोपाळ मध्यप्रदेश : लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच नवविवाहित तरुणी ब्राह्मणासोबतच पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशातील सिरोंजमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दैनिक भास्कर या वृत्तपत्राने याबाबतच वृत्त दिलं आहे. दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार, सिरोंजमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचे बासौदमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत लग्न झाले होते. या …

ज्याने लग्न लावलं, त्याच्यासोबत नवरी पळून गेली

भोपाळ मध्यप्रदेश : लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच नवविवाहित तरुणी ब्राह्मणासोबतच पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशातील सिरोंजमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दैनिक भास्कर या वृत्तपत्राने याबाबतच वृत्त दिलं आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार, सिरोंजमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचे बासौदमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत लग्न झाले होते. या दोघांचे लग्न विनोद नावाच्या एका ब्राह्मणाने केले होते. मोठ्या थाटामाटात लग्न झाल्यानंतर काही दिवसांसाठी नवविवाहित तरुणी आपल्या माहेरी राहण्यासाठी आली होती.

नवविवाहित तरुणी माहेरी आली असताना, 23 मे रोजी सिरोंजमध्ये एक लग्नसोहळा होणार होता. हे लग्न विनोदच करणार होता. मात्र लग्नाच्या विधी सुरु होण्यापूर्वी विनोद अचानक गायब झाला. यानंतर सर्वांनी ब्राह्मणाची शोध घेण्यास सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यानंतरही विनोद काही सापडला नाही. विशेष म्हणजे लग्नानंतर माहेरपणासाठी आलेली नवविवाहित तरुणीही बेपत्ता असल्याचे तिच्या नातेवाईकांना समजलं.

यानंतर तरुणीच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करत चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान नवविवाहित तरुणी आणि ब्राह्मण विनोद पळून गेल्याचं पोलिसांना समजलं. तसेच या दोघांचे गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचंही पोलिसांच्या गावातील लोकांनी माहिती दिली

चौकशीसाठी पोलीस विनोदच्या घरी गेले असता, तिथे त्यांना विनोदचे लग्न झाल्याची आणखी एक धक्कादायक गोष्ट समजली. विशेष म्हणजे विनोदला दोन मुलंही असल्याचं पोलिसांना समजलं.

यानंतर पोलिसांनी नवविवाहित तरुणीच्या नातेवाईकांची चौकशी केली असता, तरुणी पळून जाताना आपल्यासोबत दीड लाख रुपयाचे दागिने आणि 30 हजाराची रोख रक्कम घेऊन गेल्याचं सांगितलं. दरम्यान अद्याप विनोद आणि नवविवाहित तरुणी बेपत्ता आहे. सध्या पोलिस या दोघांचा  शोध घेत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *