निकृष्ट बांधकामामुळे मेट्रोचा खांब तोडण्याची नामुष्की

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड ते पुणे या दोन शहरांमधील प्रवास सुखकर व्हावा म्हणून पिंपरी ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सुरु केली जाणार आहे. त्यासाठी कामही युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र कामाच्या दर्जाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतंच फुगेवाडी येथील खांबाचं बांधकाम निकृष्ट असल्याचे आढळले आणि रातोरात खांब तोडण्यात आला. पिंपरी-स्वारगेट मेट्रोचं काम 2019 सालाच्या […]

निकृष्ट बांधकामामुळे मेट्रोचा खांब तोडण्याची नामुष्की
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड ते पुणे या दोन शहरांमधील प्रवास सुखकर व्हावा म्हणून पिंपरी ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सुरु केली जाणार आहे. त्यासाठी कामही युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र कामाच्या दर्जाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतंच फुगेवाडी येथील खांबाचं बांधकाम निकृष्ट असल्याचे आढळले आणि रातोरात खांब तोडण्यात आला.

पिंपरी-स्वारगेट मेट्रोचं काम 2019 सालाच्या आधी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे अहवालातून समोर आल्याने, काही खांब तोडण्याची नामुष्की ओढवली आहे. असे आतापर्यंत तीन खांब तोडण्यात आले आहेत. इतर खांबांचा दर्जा उत्तम असेल का, अशी शंका आता नागिरकांच्या मनात सतावू लागली आहे.

अभियंत्याचं निलंबन, प्रकरणाची चौकशीही केली जाणार

पिंपरी ते रेंजहिल्स मार्गावर कासारवाडीजवळ मेट्रोच्या एका खांबाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे लक्षात आल्याने ‘महामेट्रो’च्या सल्लागाराच्या एका अभियंत्यासह कंत्राटदाराच्या एका अभियंत्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. त्याशिवाय, या प्रकरणाची महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) दर्जा नियंत्रकांकडून स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे.

‘महामेट्रो’चं काय म्हणणं आहे?

गेल्या दीड वर्षांपासून पिंपरी मार्गावरील काम ‘महामेट्रो’ने सुरु केले आहे. आतापर्यंत सुमारे दीडशेहून अधिक खांबांची उभारणी पूर्ण झाली असून, फुगेवाडीजवळच्या एका खांबाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आले. या खांबाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून, विविध स्वरुपात त्याचा दर्जा तपासून मगच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ‘महामेट्रो’ने स्पष्ट केले. या प्रकरणात दोन अभियंत्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिले. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे.

मेट्रोमुळे प्रवास सुखकर होणार, पण कामाच्या दर्जावर शंका

मेट्रो रेल्वे वातानुकूलित सेवा असून, नागरिकांना कमी वेळेत, आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणविरहीत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना पिंपरी महापालिकेपासून स्वारगेटपर्यंतच्या 16 किलोमीटर अंतराचा प्रवास केवळ अर्ध्या तासात करता येईल. मात्र, हे काम करताना मेट्रो कॉपोरेशनच्या अनेक त्रुटी समोर येत आहेत. यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील मेट्रोला नोटीस बजावली होती. याशिवाय पुणे मेट्रोचे काम सुरु असतानाच नागपूर मेट्रोचे फलक वापरल्याने मेट्रो कॉपोरेशनच्या कामकाजावर टीका झाली होती.

निवडणुकांच्या गडबडीत कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष?

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम पूर्ण करण्याच्या गडबडीत कामाच्य दर्जाकडे दुर्लक्ष होऊ नये, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. कारण कामाच्या दर्जात कोणताही हलगर्जीपणा झाल्यास भविष्यात त्याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जाते आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.