Corona LIVE | राज्यात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या 400 पार

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चारशेच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले (Maharashtra Corona Latest Update) आहे.

Corona LIVE | राज्यात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या 400 पार

Corona Live मुंबई : महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चारशेच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 416 वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत 17 जणांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत.

Corona LIVE Update

आज कुठे किती कोरोना पॉझिटिव्ह सापडले?

  • मुंबई – 57
  • पुणे – 6
  • पिंपरी-चिंचवड – 3
  • ठाणे – 5
  • अहमदनगर – 9
  • बुलडाणा – 1
  • वसई – 1
  • हिंगोली – 1

पुणे शहरातील दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. त्या दोघांवरही डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे शहरात 33, तर पुणे ग्रामीणमध्ये 07 असे कोरोनाचे 40 रुग्ण झाले आहेत. यातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिपरी चिंचवडमध्ये 12 कोरोनाग्रस्त असून यापैकी दहा जण आधीच कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 52 वर गेला आहे.

हेही वाचा : निझामुद्दीनमधील तब्लिगींचा मस्तवालपणा, डॉक्टरांवर थुंकून शिवीगाळ

दरम्यान, बुलडाण्यातही आणखी एकाचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 वर गेली आहे. त्यातील एकाचा आधीच मृत्यू झालेला आहे. काल दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तिघांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.

(Maharashtra Corona Latest Update)

महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?

मुंबई – 238
पुणे – 44
पिंपरी चिंचवड – 15
सांगली – 25
नागपूर –  16
नवी मुंबई – 13
कल्याण – 10
ठाणे – 8
वसई विरार – 6
पनवेल – 2
उल्हासनगर – 1
अहमदनगर – 17
बुलडाणा – 5
यवतमाळ – 4
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
नाशिक – 1
जळगाव- 1
हिंगोली – 1
इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 417

ताजी आकडेवारी इथे पहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई410993741319
पुणे (शहर+ग्रामीण)7451938320
पिंपरी चिंचवड मनपा468349
ठाणे (शहर+ग्रामीण)
46543690
नवी मुंबई मनपा27298067
कल्याण डोंबिवली मनपा13339127
उल्हासनगर मनपा3566
भिवंडी निजामपूर मनपा154116
मिरा भाईंदर मनपा71515719
पालघर 15213
वसई विरार मनपा91910530
रायगड632520
पनवेल मनपा51321
नाशिक (शहर +ग्रामीण)42129
मालेगाव मनपा76158
अहमदनगर (शहर+ग्रामीण)120366
धुळे14516
जळगाव 696172
नंदूरबार 353
सोलापूर9334170
सातारा527316
कोल्हापूर 50924
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी26425
औरंगाबाद15431468
जालना1291
हिंगोली 19010
परभणी631
लातूर 12583
उस्मानाबाद 7631
बीड471
नांदेड 1236
अकोला 6031428
अमरावती 23216
यवतमाळ 130221
बुलडाणा 6383
वाशिम 80
नागपूर5928411
वर्धा 901
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर2610
गडचिरोली3600
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)60015
एकूण70013301082362

(Maharashtra Corona Latest Update)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *