Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार पार, दिवसभरात सर्वाधिक 97 बळी

आज दिवसभरात सर्वाधिक 97 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 1792 वर पोहोचली आहे.  (Maharashtra Corona Patient Latest Update)

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार पार, दिवसभरात सर्वाधिक 97 बळी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं (Maharashtra Corona Patient Latest Update) आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात आज 2091 नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आकडा 54 हजार 758 वर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात सर्वाधिक 97 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 1792 वर पोहोचली आहे.

राज्यात आतापर्यंत 1168 रुग्ण बरे होऊन घरी गेले (Maharashtra Corona Patient Latest Update) आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देणाऱ्यांची संख्या 16 हजार 954 इतकी झाली आहे. त्यामुळे सध्या 36 हजार 004 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात आज सर्वाधिक 97 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 1792 इतकी झाली आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे 17 एप्रिल ते 23 मे या कालावधीतील आहेत.

या कालावधीतील 62 मृत्यूपैकी मुंबईचे 19, ठाण्याचे 15, कल्याण-डोंबिवलीचे 9, सोलापूरचे 6, मिरा-भाईंदरचे 5, उल्हासनगरचे 3, मालेगावमधील 3 तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील 1 मृत्यू झाला आहे.

तर आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 39, पुण्यात 8, ठाणे शहरात 15, औरंगाबाद शहरात 5, सोलापूरात 7, कल्याण डोंबिवलीमध्ये 10, मीरा-भाईंदरमध्ये 5, मालेगाव आणि उल्हासनगर मध्ये प्रत्येकी 3, नागपूर शहरात 1, रत्नागिरीमध्ये 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 32 हजारवर

मुंबईत आज दिवसभरात 1002 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 32 हजार 974 इतकी झाली आहे. तर आज मुंबईत 39 मृत्यू झाले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाबळींचा आकडा 1065 वर पोहोचला (Maharashtra Corona Patient Latest Update) आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी 

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई95100666335405
पुणे (शहर+ग्रामीण)42092172021152
ठाणे (शहर+ग्रामीण)65324295481769
पालघर 102265223202
रायगड91104222167
रत्नागिरी91662432
सिंधुदुर्ग2622205
सातारा1855107169
सांगली64838519
नाशिक (शहर +ग्रामीण)76634435306
अहमदनगर (शहर+ग्रामीण)98056426
धुळे161086478
जळगाव 63553661361
नंदूरबार 28216711
सोलापूर44782233357
कोल्हापूर 132283120
औरंगाबाद86594489345
जालना108458047
हिंगोली 3442862
परभणी2271197
लातूर 75835037
उस्मानाबाद 41025117
बीड2411245
नांदेड 63925427
अकोला 1900154795
अमरावती 91664737
यवतमाळ 46929814
बुलडाणा 42021617
वाशिम 2531105
नागपूर2156140423
वर्धा 44141
भंडारा175902
गोंदिया 2171623
चंद्रपूर1841020
गडचिरोली136711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)210031
एकूण2,67,6651,49,00710,695

संबंधित बातम्या : 

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या वाढतीच, सर्वाधिक कोरोनाबळी मालेगावात

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढताच, राज्यात एकाच दिवसात 80 पोलीस पॉझिटिव्ह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *