Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात दिवसभरात सर्वाधिक 2940 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 44 हजार पार, 4 लाखांहून अधिक होम क्वारंटाईन

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 44 हजारच्या पार गेला आहे. राज्यात जवळपास 4 लाख लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. (Maharashtra Corona Virus Cases Update)

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात दिवसभरात सर्वाधिक 2940 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 44 हजार पार, 4 लाखांहून अधिक होम क्वारंटाईन

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 582 वर पोहोचली (Maharashtra Corona Virus Cases Update) आहे. राज्यात आज सर्वाधिक 2940 रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 44 हजारच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे राज्यात आतापर्यंत जवळपास 4 लाख लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

तर दुसरीकडे आज राज्यात 63 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 हजार 517 वर पोहोचला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी  मुंबईत 27, पुण्यात 9, जळगावमध्ये 8, सोलापूरात 5, वसई विरारमध्ये 3, औरंगाबाद  शहरात 3, साताऱ्यात 2, मालेगाव 1, ठाणे 1, कल्याण डोंबिवली 1, उल्हासनगर 1, पनवेल 1 तर नागपूर शहरात 1 मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 32 हजार 777 नमुन्यांपैकी 2 लाख 88 हजार 195 जणांचे प्रयोगशाळा नमूने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर 44 हजार 582 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 69 हजार 275 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 28 हजार 430 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 857 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात 12 हजार 583 रुग्ण बरे झाले आहेत. त्यानुसार राज्यात सध्या 30 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. (Maharashtra Corona Virus Cases Update)

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची अपडेट

राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण – 2940
आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या – 44582
कोरोना बळी – 63 मृत्यू
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा मृत्यू – 1517
आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – 857
एकूण डिस्चार्ज – 12583

(Maharashtra Corona Virus Cases Update)

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती नवे रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई434923741417
पुणे (शहर+ग्रामीण)7961938356
पिंपरी चिंचवड मनपा5023411
ठाणे (शहर+ग्रामीण)
50523693
नवी मुंबई मनपा30018074
कल्याण डोंबिवली मनपा14449127
उल्हासनगर मनपा4069
भिवंडी निजामपूर मनपा199117
मिरा भाईंदर मनपा76315730
पालघर 17113
वसई विरार मनपा102810531
रायगड673526
पनवेल मनपा56525
नाशिक (शहर +ग्रामीण)473210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)165368
धुळे17720
जळगाव 781174
नंदूरबार 374
सोलापूर10324185
सातारा564322
कोल्हापूर 60726
सांगली126294
सिंधुदुर्ग7820
रत्नागिरी31425
औरंगाबाद16531484
जालना1542
हिंगोली 19310
परभणी731
लातूर 12583
उस्मानाबाद 9132
बीड491
नांदेड 1356
अकोला 6471433
अमरावती 26116
यवतमाळ 148221
बुलडाणा 7483
वाशिम 80
नागपूर6358411
वर्धा 901
भंडारा3700
गोंदिया 6610
चंद्रपूर2710
गडचिरोली3900
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)63018
एकूण74860323292587

संबंधित बातम्या :

जळगावातील कोरोनाबाधितांचा आकडा 381 वर, दिवसभरात 30 जणांना लागण, एका कुटुंबातील 16 जणांचा समावेश

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात लालपरी रस्त्यावर, नॉन रेड झोनमध्ये एसटी वाहतूक सुरु

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *