Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 105 जणांचा कोरोनाने मृत्यू, बाधितांचा आकडा 56,948 वर

दिवसभरात तब्बल 2 हजार 190 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 56 हजार 948 वर पोहोचली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 105 जणांचा कोरोनाने मृत्यू, बाधितांचा आकडा 56,948 वर

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 105 कोरोना (Maharashtra Corona Virus Latest Update) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 2 हजार 190 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 56 हजार 948 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात (Maharashtra Corona Virus Latest Update) आला आहे.

राज्यात आतापर्यंत 17 हजार 918 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 37 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज सर्वाधिक 105 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 1897 इतकी झाली आहे. आज झालेल्या 105 मृत्यूपैकी मुंबईचे 32, ठाण्याचे 16, जळगावचे 10, पुण्यातील 9, नवी मुंबईतील 7, रायगडमधील 7, अकोल्यातील 6, औरंगाबादमधील 4, नाशिकमधील 3, सोलापुरातील 3, साताऱ्यातील 2, अहमदनगर येथील 1, नागपुरातील 1, नंदूरबार येथील 1, पनवेल येथील 1 तर विरारमधील एकाचा समावेश आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजारांच्या दिशेने

मुंबईत दिवसभरात 1002 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही 32 हजार 974 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1065 वर पोहोचली आहे. तर आज 410 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत मुंबईत 8814 जणांनी कोरोनावर मात केली (Maharashtra Corona Virus Latest Update) आहे.

पुण्यात 5 हजार 533 कोरोनाबाधित

पुण्यात आज दिवसभरात तब्बल 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत 284 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 106 नवीन बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5,533 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 184 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 3,059 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात 2 हजार 190 अॅक्टिव्ह रुग्ण तर 171 क्रिटिकल आणि 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई85270571524938
पुणे (शहर+ग्रामीण)2899613971889
ठाणे (शहर+ग्रामीण)49485186721327
पालघर 78233117140
रायगड61062894110
रत्नागिरी72648328
सिंधुदुर्ग2471795
सातारा137479352
सांगली46225411
नाशिक (शहर +ग्रामीण)54783159242
अहमदनगर (शहर+ग्रामीण)58639016
धुळे127472465
जळगाव 44732506294
नंदूरबार 2081399
सोलापूर32411741303
कोल्हापूर 94973313
औरंगाबाद68123006301
जालना75839729
हिंगोली 2972541
परभणी136834
लातूर 44623224
उस्मानाबाद 28519313
बीड149953
नांदेड 40924215
अकोला 1703122489
अमरावती 70848131
यवतमाळ 34123811
बुलडाणा 31818213
वाशिम 120933
नागपूर1753131016
वर्धा 17131
भंडारा94780
गोंदिया 1671052
चंद्रपूर120690
गडचिरोली91601
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)139025
एकूण2,11,9871,15,2629,026

Maharashtra Corona Virus Latest Update

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्यात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं, आतापर्यंत 2,875 जणांची कोरोनावर मात

गडचिरोलीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, मुंबई-पुण्यातून आलेल्या 26 जणांना लागण

मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी अहमदनगरची चिंता वाढवली, जिल्ह्यात 94 कोरोनाबाधित

पुण्यात कोरोना लक्षणांच्या दुर्लक्षाने शुक्रवारी एका तरुणाचा, तर सोमवारी एका महिलेचा मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *