महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा, 16 नव्या रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा आकडा 1380 वर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस (Maharashtra COVID 19 Positive) वाढत आहे. आज महाराष्ट्रात 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा, 16 नव्या रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा आकडा  1380 वर

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस (Maharashtra COVID 19 Positive) वाढत आहे. आज महाराष्ट्रात 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 364 वरुन 1 हजार 380 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला (Maharashtra COVID 19 Positive) आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 380 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात काल (9 एप्रिल) सर्वाधिक 229 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1हजार 364 वर पोहोचला होता. तर महाराष्ट्रात काल कोरोनाचे 25 बळी गेले. त्यामुळे राज्यात कोरोनाबळींची संख्या 97 वर पोहोचली आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 857 वर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत काल 143 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

मुंबईत अनेक लहान मुलानांही कोरोनाचा विळखा बसत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये 21 चिमुरडे आहेत. तर 1 ते 10 वयोगटातल्या 21 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 11 ते 20 वयोगटातील 56 मुले कोरोनाग्रस्त असल्याचे उघडकीस आले आहेत.

पुणे विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या 246 वर पोहोचली आहे. यातील 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून 53 नवे रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर पुणे विभागातील मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे.

तर विदर्भात काल एका दिवशी 22 नवे रुग्ण आढळले. यात अकोल्यात सर्वाधिक 11 नवे रुग्ण आहेत. तर नागपुरात 6, बुलडाण्यात 5 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

देशात कोरोनाचे 227 बळी

त्याशिवाय देशभरात काल (9 एप्रिल) कोरोनाचे 61 बळी गेले आहेत. यात देशभरातल्या कोरोनाबळींचा एकूण आकडा 227 वर गेला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्याही 6 हजार 738 वर गेली आहे. भारतात काल 781 नवे रुग्ण समोर आले (Maharashtra COVID 19 Positive) आहेत.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई434923741417
पुणे (शहर+ग्रामीण)7961938356
पिंपरी चिंचवड मनपा5023411
ठाणे (शहर+ग्रामीण)
50523693
नवी मुंबई मनपा30018074
कल्याण डोंबिवली मनपा14449127
उल्हासनगर मनपा4069
भिवंडी निजामपूर मनपा199117
मिरा भाईंदर मनपा76315730
पालघर 17113
वसई विरार मनपा102810531
रायगड673526
पनवेल मनपा56525
नाशिक (शहर +ग्रामीण)473210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)165368
धुळे17720
जळगाव 781174
नंदूरबार 374
सोलापूर10324185
सातारा564322
कोल्हापूर 60726
सांगली126294
सिंधुदुर्ग7820
रत्नागिरी31425
औरंगाबाद16531484
जालना1542
हिंगोली 19310
परभणी731
लातूर 12583
उस्मानाबाद 9132
बीड491
नांदेड 1356
अकोला 6471433
अमरावती 26116
यवतमाळ 148221
बुलडाणा 7483
वाशिम 80
नागपूर6358411
वर्धा 901
भंडारा3700
गोंदिया 6610
चंद्रपूर2710
गडचिरोली3900
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)63018
एकूण74860323292587
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *