…म्हणून गृहमंत्र्यांनी पोलिस नाईक प्रशांत घरत यांना ठोकला सॅल्यूट

पोलिस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे अलिबागला जाणाऱ्या लाँचमधील 88 प्रवाशांचे प्राण वाचले होते Anil Deshmukh Salutes Prashant Gharat

...म्हणून गृहमंत्र्यांनी पोलिस नाईक प्रशांत घरत यांना ठोकला सॅल्यूट
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 2:33 PM

मुंबई : गेट वे ऑफ इंडियाहून अलिबागला जाताना अपघातग्रस्त झालेल्या प्रवासी बोटीतील 88 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या पोलिसाला गृहमंत्र्यांनी सॅल्यूट ठोकला. अनिल देशमुख यांनी मांडवा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रशांत घरत यांचं जाहीर कौतुक केलं. (Anil Deshmukh Salutes Prashant Gharat)

‘पोलिस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या कामगिरीमुळे अलिबागला जाणाऱ्या लाँचमधील 88 प्रवाशांचा प्राण वाचला. अवघ्या महाराष्ट्राच्या कौतुकाला पात्र ठरलेल्या या बहादुराला गृहमंत्री म्हणून माझाही महासॅल्यूट’ असं अनिल देशमुख यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

कसा झाला अपघात?

मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी बोट शनिवार 14 मार्च रोजी अलिबागजवळच्या समुद्रात उलटली होती. यावेळी बोटीत 88 प्रवासी होते, मात्र सुदैवाने सर्वांची सुखरुप सुटका झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बोट खडकावर आदळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. अपघातानंतर बोट एका दिशेने कलंडली होती. मात्र मांडवा पोलिस कर्मचारी प्रशांत घरत आणि ‘सद्गुरु कृपा’ बोटीचे दोन खलाशी बचावकार्याला आले.

पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन बहुतांश प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहचवण्यात आले. अन्य काही जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले. सर्व प्रवाशांची वेळीच सुटका झाल्यामुळे मोठा अपघात टळला.

भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो रो सेवा आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरु करण्यात आली. या बोटीच्या चाचणीवेळीही मांडवा टर्मिनलवर बोट धडकून अपघात झाला होता. सुदैवाने त्यावेळीही अपघाताची व्याप्ती मोठी नव्हती.

अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या बोटींच्या ताफ्यातील एका स्पीड बोटला दीड वर्षांपूर्वी अपघात झाला होता. ही बोटही खडकावर आदळून बुडाली होती. बोटीवर असलेल्या 25 जणांपैकी 24 जणांना वाचवण्यात यश आलं होतं, तर सिद्धेश पवार या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. (Anil Deshmukh Salutes Prashant Gharat)

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....