“इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर तृप्ती देसाईंचे तोंड काळे करु”

"तृप्ती देसाई जर इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर त्यांचे तोंड काळे करु", असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर (Maharashtra Karani Sena criticized on trupti desai) यांनी दिला आहे.

इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर तृप्ती देसाईंचे तोंड काळे करु
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 7:35 PM

मुंबई : “तृप्ती देसाई जर इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर त्यांचे तोंड काळे करु”, असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर (Maharashtra Karani Sena criticized on trupti desai) यांनी दिला आहे. इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र या वक्तव्याचे काही लोक समर्थन तर काही लोक विरोध करत (Maharashtra Karani Sena criticized on trupti desai) आहेत.

“तृप्ती देसाई जर इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर त्यांचे तोंड काळे करु. तृप्ती देसाई ही ख्रिश्चन धर्माची आहे तिने हिंदू धर्मात लुडबुड करु नये”, असं अजय सिंह सेंगर म्हणाले.

तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

“इंदोरीकर अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आमचं शिष्टमंडळ अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे इंदोरीकरांची बाजू घेतात, हे दुर्दैवी आहे. बच्चू कडू हे महिला आणि बालकल्याण विकास विभागाचे राज्यमंत्री आहेत, हाच एक विनोद आहे. ते वारंवार महिलांचा अपमान करतात”, अशी टीका तृप्ती देसाई यांनी ‘टीव्ही9’ शी बोलताना केली.

“गुन्हा दाखल झाला की इंदोरीकरांना अटक करण्यात यावी. त्यांनी संपूर्ण महिलावर्गाची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंदोरीकरांविरोधात गुन्हा दाखल करावा. जर तसं झालं नाही, तर येत्या अधिवेशनात त्याविरोधात आंदेलन करणार”, असा इशाराही तृप्ती देसाईंनी दिला.

शिवप्रतिष्ठान संघटनेचाही इंदोरीकर महाराजांना पाठिंबा 

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनीही इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दर्शवला आहे. जर इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर शिप्रतिष्ठान रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवप्रतिष्ठानने दिला आहे.

Non Stop LIVE Update
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.