कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढताच, एकाच दिवसात राज्यात 87 पोलीस पॉझिटिव्ह

आतापर्यंत 183 अधिकारी आणि 1575 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. (Maharashtra Police Corona Positive)

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढताच, एकाच दिवसात राज्यात 87 पोलीस पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 3:10 PM

मुंबई : राज्य पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आजच्या दिवसात 87 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत एकूण 1758 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Maharashtra Police Corona Positive)

काल एका दिवसात पाच पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती, तर आज (रविवार 24 मे) 87 पोलिसांना लागण झाली आहे. एका दिवसात 200 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत, ही दिलासादायक बाबही आहे.

आतापर्यंत 183 अधिकारी आणि 1575 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 131 अधिकारी आणि 936 अशा एकूण 1067 पोलिसात लक्षणं दिसून येत आहेत. आतापर्यंत 18 कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. यामध्ये ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन येथील महिला कॉन्स्टेबलचा समावेश होता. तर 51 अधिकारी आणि 622 पोलीस कर्मचारी असे एकूण 673 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. पोलिसांवर 248 ठिकाणी झाले असून प्रकरणी 830 हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. काल 2 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झालेत. आतापर्यंतच्या हल्ल्यात 86 पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी झाले आहेत.

लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात कलम 188 नुसार राज्यभरात एक लाख 13 हजार 893 गुन्हे दाखल झाले आहेत, तर 22 हजार 794 नागरिकांना अटक झाली असून 69 हजार 567 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

राज्यभरात पोलिसांनी हातावर क्वारंटाईन असा शिक्का असलेल्या 695 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या 1322 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कालावधीत आरोपींकडून पाच कोटी 28 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यभरात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवकांवर हल्ल्याच्या 40 घटना घडल्या आहेत. (Maharashtra Police Corona Positive)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.