कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढताच, राज्यात एकाच दिवसात 80 पोलीस पॉझिटिव्ह

आतापर्यंत एकूण 207 पोलीस अधिकाऱ्यांना आणि 1682 कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे (Maharashtra Police Corona Positive)

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढताच, राज्यात एकाच दिवसात 80 पोलीस पॉझिटिव्ह

मुंबई : राज्य पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आजच्या दिवसात (26 मे) 80 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 1889 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Maharashtra Police Corona Positive)

कालच्या दिवसात 51, तर रविवारी 87 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आतापर्यंत एकूण 207 पोलीस अधिकाऱ्यांना आणि 1682 कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे. कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 139 अधिकारी आणि 892 अशा एकूण 1031 पोलिसात ही लक्षणं दिसून येत आहेत. आतापर्यंत 20 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एका दिवसात 160 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत, ही त्यात दिलासादायक बाब. 67 अधिकारी आणि 771 पोलीस कर्मचारी असे एकूण 838 जण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत.

संचारबंदीच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांवर 252 ठिकाणी हल्ले झाले असून प्रकरणी 832 हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. काल चार ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. नागरिकांच्या हल्ल्यात एकूण 85 पोलीस आणि एक होमगार्ड जखमी झाले आहेत.

राज्यभरात कलम 188 नुसार एक लाख 15 हजार 263 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 23 हजार 204 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 72 हजार 687 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

राज्यभरात पोलिसांनी हातावर क्वारंटाईन असा शिक्का असलेल्या 695 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या 1322 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कालावधीत आरोपींकडून पाच कोटी 48 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यभरात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवकांवर हल्ल्याच्या 40 घटना घडल्या आहेत.

(Maharashtra Police Corona Positive)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *