Corona : मालेगावात दोन कोरोना संशयित महिलांच्या मृत्यूने खळबळ, अहवालाची प्रतीक्षा

नाशकातील मालेगावात दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या महिलांच्या कोविड-19 चाचण्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

Corona : मालेगावात दोन कोरोना संशयित महिलांच्या मृत्यूने खळबळ, अहवालाची प्रतीक्षा
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 12:42 AM
नाशिक : राज्यात कोरोनाचा विळखा वाढतच (Malegaon Corona Suspect Died) आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तर कोरोनाबळींची संख्याही वाढत आहे. नाशकातील मालेगावात दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव सामान्य रुग्णालयात 13 एप्रिलला पहाटेच्या सुमारास या दोन रुग्णांचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाला (Malegaon Corona Suspect Died) आहे.
मृत्यू झालेले दोन्ही रुग्ण या महिला होत्या. या महिलांना न्युमोनिया, श्वसनाचा त्रास, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. यामध्ये एक 58 वर्षीय महिला मालेगाव शहरातील असून दुसरी 48 वर्षीय महिला या नांदगाव तालुक्यातील असल्याची माहिती आहे.  मालेगाव शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर या दोन्ही कोरोना संशयित महिलांच्या घशातील स्वॅब नमुने पुण्याला कोविड-19 च्या चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल आल्यानंतरच या महिलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला की नाही, हे समोर येणार आहे. मालेगावात आतापर्यंत 2 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, तर 29 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

मालेगाव शहरातील आणि नांदगाव तालुक्यातील या दोन्ही (Malegaon Corona Suspect Died) महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी शनिवारी दाखल झाल्या होत्या. यातील एका महिलेला श्वसनाचा अधिक त्रास होत होता, तर दुसऱ्या महिला मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासाने ग्रासली होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्याचे येथील डॉक्टरांनी ठरवले.
रविवारी रात्री या महिलांचा त्रास अधिकच वाढला होता. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास या महिलांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले आणि त्यांचा मृत्यू झाला. सध्या मालेगाववर कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे दोन्ही महिलांचे स्वॅब नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 14 एप्रिलला रात्रीपर्यंत हे अहवाल येण्याची शक्यता आहे. हे अहवाल आल्यावरच या महिलांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. महिलांच्या मृत्यूनंतर महिलांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला, अशी माहिती वैज्ञकीय अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2334

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 2334 पर्यंत पोहचली आहे. आज (13 एप्रिल) राज्यात एकूण 352 नवीन रुग्णांचं निदान झालं (Total Corona Patient in Maharashtra). दिवसभरात 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 160 वर पोहचला आहे. आत्तापर्यंत राज्यात उपचारानंतर एकूण 229 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

आज झालेल्या एकूण 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूपैकी मुंबईचे 9 आणि पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहेत. या मृतांपैकी 4 पुरुष तर 7 महिला आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 11 रुग्णांपैकी 6 जणांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक होतं. 5 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 11 जणांपैकी 8 रुग्णांमध्ये (73 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे.

Malegaon Corona Suspect Died

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.