नागपुरात 5 वर्षात 1592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 617 पीडित कुटुंबं मदतीसाठीही अपात्र

राज्यात सरकार कोणाचंही असो मात्र शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही (Suicide Farmers Family).

नागपुरात 5 वर्षात 1592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 617 पीडित कुटुंबं मदतीसाठीही अपात्र
Follow us
| Updated on: Jan 28, 2020 | 8:43 PM

नागपूर : राज्यात सरकार कोणाचंही असो मात्र शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही (Suicide Farmers Family). मागील 5 वर्षात एकट्या नागपूर विभागात 1592 शेतकऱ्यांनी आयुष्याला कंटाळून आत्महत्या केल्या. असं होऊनही 1592 पैकी केवळ 901 शेतकऱ्यांच्या आत्महत्याच सरकारी मदतीसाठी पात्र ठरल्या. इतर 617 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आल्या (Suicide Farmers Family). माहिती अधिकारातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

विदर्भाची भूमी कधीकाळी सुपीक भूमी समजली जायची. मात्र, त्याच भूमीत मोठ्या प्रमाणात बळीराजाच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे विदर्भाची ओळख आत्महत्यांचा प्रदेश अशी झाली. ही ओळख पुसण्याचे अनेक प्रयत्न होत असल्याचं प्रत्येक सरकार सांगतं. मात्र, अजून ते झालेलं दिसत नाही.

मागल 5 वर्षातील एकट्या नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांचा विचार केला तर 1592 एवढ्या आत्महत्या झाल्याचं पुढे आलं. त्यात फक्त 901 प्रकरणं पात्र ठरली, तर 617 अपात्र ठरली. जे पात्र ठरली. पात्र 901 कुटुंबांना 5 वर्षात 9 कोटी 1 लाख रुपयांची सरकारी मदत देण्यात आली. मात्र, अपात्र ठरलेल्या कुटुंबांना काहीही मदत मिळाली नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर यांनी दिली.

2015 ते 2019 दरम्यान नागपूर विभागातील जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्या

नागपूर – 256

वर्धा – 623

भंडारा – 206

गोंदिया – 107

चंद्रपूर – 352

गडचिरोली – 48

नागपूर विभागातील एकूण 1592 आत्महत्यापैकी सर्वात कमी आत्महत्या मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात झाल्या. असं असलं तरी एकूण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांपैकी अत्यंत कमी कुटुंबांना आर्थिक मदत मिळताना दिसत आहे. या आत्महत्यांवर प्रत्येक जण बोलत असलं, आपापली मतं व्यक्त करत असलं तरी आत्महत्येच्या संख्येत घट होताना दिसत नाही. त्यामुळे एकूणच या विषयावर गांभीर्याने विचार करुन ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.