मौलानाचं धाडस, ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये पत्नीला तलाक!

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई: मुंबईच्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात एका मौलानानेच आपल्या पतीला चक्क पोलीस ठाण्याच्या आत तलाक तलाक तलाक म्हणत सोडून दिलं. कायद्याच्या रक्षकांसमोर जर ट्रिपल तलाक होत असेल, तर मुस्लिम महिलांना संरक्षण देणाऱ्या या कायद्याची झालेली क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. मोहम्मद उमर शेख असं या इसमाचं नाव आहे. 55 वर्षीय मोहम्मद उमर …

, मौलानाचं धाडस, ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये पत्नीला तलाक!

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई: मुंबईच्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात एका मौलानानेच आपल्या पतीला चक्क पोलीस ठाण्याच्या आत तलाक तलाक तलाक म्हणत सोडून दिलं. कायद्याच्या रक्षकांसमोर जर ट्रिपल तलाक होत असेल, तर मुस्लिम महिलांना संरक्षण देणाऱ्या या कायद्याची झालेली क्रूर थट्टाच म्हणावी लागेल.

मोहम्मद उमर शेख असं या इसमाचं नाव आहे. 55 वर्षीय मोहम्मद उमर एक मौलाना आहे. धार्मिक कार्यात नाव कमवण्याऐवजी या मौलानाला वेगळ्याच गोष्टींमध्ये रस आहे. या मौलानाने आपल्याच पत्नीला पोलीस ठाण्यात ट्रिपल तलाक दिलाय.

पीडित महिला कनिस शेखने एप्रिल 2017 मध्ये या मौलानाशी लग्न केलं. लग्न करताना कनिसच्या दोघा मुलांना सांभाळण्याच आश्वासन त्याने दिलं होतं. लग्न झालं, दोघं एकत्र नांदू लागले. मात्र काही दिवसातच या मौलानाचा खरा चेहरा कनिसच्या समोर आला. तो तिला घरुन एक लाख रुपये आणण्यासाठी जबरदस्ती करु लागला आणि पैसे न दिल्यास दुसरं लग्न करण्याची धमकी दिली. यावेळी मौलानाची या आधीच अनेक लग्न झाली असल्याची माहितीही कनिसला मिळाली.

कनिसचं हे दुसरं लग्न असून पहिल्या लग्नापासून तिला दोन मुलं आहेत, तर मौलानाकडून देखील 9 महिन्यांचं मुल आहे. त्याच्या छळाला कंटाळून तिने ट्रॉम्बे पोलीस स्टेशन गाठलं. मौलाना मोहम्मद उमर शेखला पोलिसांनी बोलावलं. त्यानं चक्क पोलिसांसमोर कनिसला तलाक, तलाक, तलाक म्हणत ट्रिपल तलाक दिला. हे सर्व सुरु असताना कायद्याचे रक्षक पोलीस बघत राहिले. देशभरात काही महिन्यांपूर्वी ट्रिपल तलाकविरोधी कायदा करण्यात आला.  ट्रिपल तलाकच्या भस्मासुरापासून मुस्लिम महिलांचं संरक्षण करण्यासाठी मुस्लिम महिला संरक्षण कायदा 2018 लागू करण्यात आला. मात्र कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही, हेच या प्रकारावरुन सिद्ध होतंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *