कर्मचाऱ्यासोबत अफेअर, ‘मॅकडोनाल्ड्स’च्या सीईओंची हकालपट्टी

'मॅकडोनाल्ड्स'मधीलच कर्मचाऱ्याबरोबर अफेअर असल्याच्या कारणावरुन सीईओ स्टीव्ह ईस्टरब्रुक यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यासोबत अफेअर, 'मॅकडोनाल्ड्स'च्या सीईओंची हकालपट्टी
Follow us
| Updated on: Nov 04, 2019 | 12:07 PM

लंडन : ‘मॅकडोनाल्ड्स’ या जागतिक फास्ट फूड चेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘मॅकडोनाल्ड्स’मधीलच कर्मचाऱ्याबरोबर अफेअर असल्याच्या कारणावरुन ईस्टरब्रुक यांना बाहेरचा रस्ता (McDonald’s CEO Steve Easterbrook fired) दाखवण्यात आला आहे.

स्टीव्ह ईस्टरब्रुक यांचं नातं हे परस्पर संमतीने असलं तरीही कंपनीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. स्टीव्ह यांनी आपण कंपनीतील कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली ईमेलच्या माध्यमातून दिली होती.

कंपनीच्या धोरणांचा विचार करता, मी कंपनीच्या मंडळाशी सहमत आहे. आता इथून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असं स्टीव्ह म्हणाले. मॅकडोनाल्ड्स अमेरिकेचे प्रमुख ख्रिस केम्पिसिजन्स्की आता त्यांच्या जागी सूत्रं स्वीकारतील.

कोण आहेत स्टीव्ह ईस्टरब्रुक?

स्टीव्ह ईस्टरब्रुक हे लंडनमधील ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये 1993 पासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. 2011 मध्ये ते ‘पिझ्झा एक्स्प्रेस’ आणि ‘वागामामा’ या आशियाई फूड चेनच्या प्रमुखपदी गेले. 2013 मध्ये ते ‘मॅकडोनाल्ड’मध्ये पुन्हा आले. 2015 मध्ये स्टीव्ह यांच्याकडे ‘मॅकडोनाल्ड्स’ कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 52 वर्षीय स्टीव्ह ईस्टरब्रुक (McDonald’s CEO Steve Easterbrook fired) घटस्फोटित आहेत.

गर्लफ्रेण्डला अंडरवॉटर प्रपोज करण्याचा प्रयत्न, तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

2018 मध्ये स्टीव्ह यांना वार्षिक 15 लाख 90 हजार डॉलर्सचं वेतन मिळत होतं. मॅकडोनाल्ड्समधील सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या तुलनेत (7,473 डॉलर्स) हे 2 हजार 124 पटींनी अधिक असल्यामुळे मोठी टीकाही झाली होती.

गेल्याच वर्षी ‘इंटेल’ कंपनीचे प्रमुख ब्रायन क्रायनच यांनाही कंपनीतील कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या कारणास्तव पदावरुन हटवण्यात आलं होतं.

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.