मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (26 मे) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक असेल. आज मध्ये रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर आज ब्लॉक नाही. ब्लॉक दरम्यान सर्व लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावतील. मध्य […]

मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
लोकल ट्रेन
Follow us
| Updated on: May 26, 2019 | 9:25 AM

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (26 मे) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक असेल. आज मध्ये रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर आज ब्लॉक नाही. ब्लॉक दरम्यान सर्व लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. ओव्हरहेड वायर आणि सिग्नलसह इतर अन्य इतर कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय. हा ब्लॉक सकाळी 11.15 ते संध्याकाळी 3.45 पर्यंत असेल. अप जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान दादर स्टेशनवरुन दुपारी 3.40 वाजता विशेष लोकल चालवली जाईल.

हार्बर रेल्वे

वडाळा ते मानखुर्द मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.40 ते 4.10 पर्यंत हा ब्लॉक असेल. अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल या अप-डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते मानखुर्द विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 4.30 पर्यंत मेन लाईन आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरुन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.