चार दिवसांचा आठवडा ‘मायक्रॉसॉफ्ट’च्या पथ्यावर, उत्पादकतेत घसघशीत वाढ

'मायक्रोसॉफ्ट'ने जपानमधील 2 हजार 300 कर्मचाऱ्यांना दोन ऐवजी तीन दिवस सुट्टी दिल्यामुळे उत्पादकता तब्बल 40 टक्क्यांनी वाढली.

चार दिवसांचा आठवडा 'मायक्रॉसॉफ्ट'च्या पथ्यावर, उत्पादकतेत घसघशीत वाढ
ही प्रसिद्ध कंपनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना आराम करण्यासाठी देतेय एक आठवड्याची सुट्टी
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 11:02 AM

टोक्यो : ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगप्रसिद्ध कंपनीने जपानमधील कर्मचाऱ्यांना चार दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतर कंपनीची चांगलीच भरभराट झाली. प्रायोगिक तत्त्वावर 2 हजार 300 कर्मचाऱ्यांना दोन ऐवजी तीन दिवस सुट्टी (Microsoft Japan 4 days week) दिल्यामुळे उत्पादकता तब्बल 40 टक्क्यांनी वाढली.

शनिवार रविवार सुट्टी अर्थात पाच दिवसांचा आठवडा, हे प्रत्येक कर्मचाऱ्याचं स्वप्न असतं. वर्क प्रेशरच्या नावाखाली अनेक जणांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत नाही. मात्र ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने जपानमधील कर्मचाऱ्यांना एक पाऊल पुढे जात चार दिवसांचा आठवडा करुन दिला. म्हणजे शनिवार-रविवारला जोडून शुक्रवारीही हक्काची साप्ताहिक रजा.

‘वर्क लाईफ चॉइस चॅलेंज समर 2019’ अंतर्गत हा प्रयोग करण्यात आला होता. यानुसार कंपनीतील 2 हजार 300 कर्मचाऱ्यांना आठवड्यात तीन दिवस साप्ताहिक सुट्टी देण्यात आली. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ चारच दिवस काम करावं लागलं.

जपानमधील ‘वर्क कल्चर’ हे काहीसं अतिरेकी मानलं जातं. म्हणजेच बहुसंख्य कर्मचारी स्वतःला कामाच्या धबडग्यात झोकून देतात. वर्क लाईफ बॅलन्स नसल्यामुळे बहुतेक जण अतिरिक्त वेळ थांबूनही आपलं काम पूर्ण करतात.

आता, इतकी सुट्टी मिळते म्हटल्यावर कर्मचारी तर खुश होणारच ना. प्रयोगाच्या कालावधीत कुठल्याच कर्मचाऱ्याला अतिरिक्त सुट्टी घेण्याची गरज भासली नाही. सर्वांनी चार दिवस मन लावून जास्तच काम केलं. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने जपानमध्ये केलेल्या या प्रयोगाचा फायदा झाला. तीन दिवस सुट्टी दिल्यानंतरही कंपनीच्या उत्पादकता 39.9 टक्के वाढली.

कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्यामुळे कंपनीचा विजेचा वापरही कमी झाला. नेहमीच्या तुलनेत 23.1 टक्के कमी वीज वापरल्याने तो खर्चही वाचला.

कर्मचाऱ्यासोबत अफेअर, ‘मॅकडोनाल्ड्स’च्या सीईओंची हकालपट्टी

महिन्याच्या शेवटी मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचं मत विचारलं. त्यावेळी 92.1 टक्के कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील चार दिवस काम ही कल्पना चांगली असल्याचं म्हटलं आहे. प्रयोगाला मिळालेलं यश लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट तीन दिवस सुट्टी पुढेही लागू करण्याच्या विचारात आहे.

अर्थात, मायक्रोसॉफ्टने केलेल्या या प्रयोगाचा (Microsoft Japan 4 days week) प्रत्येक कंपनीला फायदा होईलच असं नाही. ज्या कंपन्यांना आठवड्यातील सात दिवस काम करावं लागतं त्यांना अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल. याचा भार कंपनीच्या बजेटवर पडू शकतो, असं मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.