नववर्षात ग्राहकांच्या खिशाला कात्री, दुधाच्या दरात प्रती लीटर 2 रुपयांची वाढ

राज्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच दूध ग्राहकांच्या खिशाला दरवाढीची झळ बसणार (milk price increase) आहे. राज्यात दुधाच्या विक्री दरात पुन्हा दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे

नववर्षात ग्राहकांच्या खिशाला कात्री, दुधाच्या दरात प्रती लीटर 2 रुपयांची वाढ

पुणे : राज्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच दूध ग्राहकांच्या खिशाला दरवाढीची झळ बसणार (milk price increase) आहे. राज्यात दुधाच्या विक्री दरात पुन्हा दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गाईच्या आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रत्येकी दोन रुपयांनी दरवाढ केली जाणार आहे. येत्या रविवारपासून म्हणजेच 12 तारखेला म्हणजेच रविवारपासून वाढीव दराने दूध विक्री होणार आहे.

नुकत्याच झालेल्या कात्रज दूध संघांमध्ये दूध व्यवसायिक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचा बैठकीत याबाबताचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला राज्यातील तब्बल 73 दूध संघांच्या उपस्थितीत हा दरवाढीचा निर्णय घेण्यात (milk price increase) आला.

गेल्याच महिन्यात 16 डिसेंबरला दोन रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतर महिना पूर्ण होण्यापूर्वी दोन रुपयांनी दरवाढ होणार आहे. येत्या 12 जानेवारीपासून दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली जाणर आहे. दुधाच्या दरात एका महिन्यात तब्बल चार रुपयांना दरवाढ होणार आहे. त्यामुळं गाईचं दूधाची 46 रुपयांवरून 48 रुपये प्रति लीटर दराने विक्री होणर आहे. तर म्हशीचं दूध 56 रुपयांवरुन 58 रुपये प्रती लीटर मिळणार आहे.

बटर आणि दूध पावडरच्या दरात वाढ झाल्याने उत्पादकांनी खरेदी दरात वाढ केली. त्यामुळे एक जानेवारीपासून ही खरेदी दराची वाढ उत्पादकांना द्यावी लागली. त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याच दूध उत्पादकांनी सांगितलं आहे. या दूध दरवाढीने माञ लाखो ग्राहकांना नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांच्या खिशाला दरवाढीचा फटका बसणार (milk price increase) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *