'जन्म द्यायला आई पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे', जागतिक महिला दिनी अशोक चव्हाणांची कविता

जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी नांदेडमध्ये एका कार्यक्रमात कविता सादर केली.

'जन्म द्यायला आई पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे', जागतिक महिला दिनी अशोक चव्हाणांची कविता

नांदेड : जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी नांदेडमध्ये एका कार्यक्रमात कविता सादर केली. त्यांच्या या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला (Minister Ashok Chavan). या कवितेमार्फत त्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीचं अनन्यसाधारण असं म्हत्त्व असल्याचं पटवून दिलं. स्त्री आई, बहिण, आजी, माऊशी, मामी, पत्नी अशा वेगवेगळ्या नात्यातून आपलं आयुष्य समृद्ध करत असते, असं अशोक चव्हाण यांनी या कवितेतून स्पष्ट केलं.

जागतिक महिला दिनानिमित्ताने नांदेड पोलीस आणि महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते (Minister Ashok Chavan). या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनपेक्षितपणे एक कविता सादर केली. त्यांच्या या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला (Minister Ashok Chavan). यावेळी नांदेड पोलिसांच्यावतीने मुलींना सुरक्षा पेनचे वाटप करण्यात आलं.

अशोक चव्हाणांची कविता

“जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहिण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे, हे सर्व करायच्या आधी एक मुलगी जगायला पाहिजे”, अशी कविता अशोक चव्हाण यांनी सादर केली.

जगभरात आज जागतिक महिला दिवस साजरा केला जात आहे. देशात आणि राज्यभरात महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. दरम्यान, नाशिक पोलिसांकडून महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘निर्भया मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, क्रीडापटू अजिंक्य राहाणे, अभिनेता जितेंद्र जोशी, अभिनेत्री रिंकू राजगुरु, अभिनेत्री जानवी कपूर आणि नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल उपस्थित होते.

दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *