मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योती हसनाळे

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडे 61 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. शिवसेनकडे 22, काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहे. बहुमताचा आकडा 48 असल्यामुळे सत्ताधारी भाजपचं पारडं जड आहे

मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योती हसनाळे

मीरा भाईंदर : मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योती हसनाळे यांची निवड झाली आहे. ज्योत्स्ना हसनाळे 55 मतं मिळवत विजयी झाल्या. भाजपच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करुनही मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपचा उमेदवार विराजमान झाला (Mira Bhaindar Mayor Election)

LIVE UPDATE

Picture

महापौरपदासाठी मतदानाला सुरुवात

मीरा भाईंदर महापौर निवडणूक : शिवसेना नगरसेविका दीप्ती भट आणि अनिता पाटील, काँग्रेस नगरसेविका सारा अक्रम खान आणि भाजप नगरसेवक विजय राय अनुपस्थित, महापौर आणि उपमहापौरपदासाठी मतदान सुरु

26/02/2020,12:00PM

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडे 61 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. शिवसेनेकडे 22, काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहे. बहुमताचा आकडा 48 असल्यामुळे सत्ताधारी भाजपचं पारडं जड आहे. त्यातच शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

मीरा भाईंदर महापौर निवडणूक : काँग्रेस नगरसेविका स्ट्रेचरवरुन महापालिकेत

नगरसेवक फुटू नये, यासाठी भाजपने नगरसेवकांना गोव्यातील ‘हॉटेल ललित’मध्ये ठेवलं आहे. महापौरपदावरुन भाजपमध्ये गटबाजी असल्याची चर्चा आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन या दोन गटात रस्सीखेच होती. मेहता गटाचा भाजप उमेदवार ज्योती हसनाळेंना पाठिंबा आहे. परंतु भाजपमधील 14 नगरसेवक गीता जैन यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं.

हेही वाचामीरा-भाईंदर महापौर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नगरसेविका बेपत्ता

शिवसेनेचे काही नगरसेवक माथेरानमध्ये आहेत. काँग्रेस नगरसेविका सारा अक्रम खान आणि अहमद शेख तर शिवसेनेच्या दीप्ती भट्ट हे नॉट रिचेबल आहेत. महापौर निवडणुकीत चमत्कार घडवणार, असा दावा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

मीरा भाईंदर महापालिकेत मेहता समर्थक ज्योती हसनाळे भाजपच्या महापौर होणार हे निश्चित आहे. परंतु गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले, तर शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Mira Bhaindar Mayor Election)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *