DIG निशिकांत मोरे विनयभंग प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, बेपत्ता मुलगी सापडली

डीआयजी निशिकांत मोरे यांनी विनयभंग केलेल्या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट समोर आलाआहे. मोरे यांच्यावर विनयभंगाचा (Missing Girl found in DIG Nishikant More molestation case) आरोप केलेली मुलगी दहा दिवसापासून बेपत्ता होती.

DIG निशिकांत मोरे विनयभंग प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, बेपत्ता मुलगी सापडली
Follow us
| Updated on: Jan 15, 2020 | 9:30 AM

नवी मुंबई : डीआयजी निशिकांत मोरे यांनी विनयभंग केलेल्या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट समोर आलाआहे. मोरे यांच्यावर विनयभंगाचा (Missing Girl found in DIG Nishikant More molestation case) आरोप केलेली मुलगी दहा दिवसापासून बेपत्ता होती. तिला काल (14 जानेवारी) नवी मुंबई पोलिसांनी देहरादूनमधून तिच्या साथीदारासोबत ताब्यात घेतले. पोलिसांनी तिचा साथीदार अंकीत सिंहवर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला (Missing Girl found in DIG Nishikant More molestation case) अटक केली आहे.

अंकित सिंह आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते. 5 जानेवारी 2020 रोजी रात्री 12 वाजता खारघरमधून मुलगी आपल्या घरातून निघून गेली होती. यावेळी तिच्यासोबत बॅग असल्याचे सीसीटीव्हीमध्येही दिसले होते. तिने घरातून निघून जाताना एक सुसाईड नोटही लिहिली होती. त्या दिवसापासून पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी आठ पथकं तयार करुन मुलीचा शोध घेत होते.

घरातून बेपत्ता होऊन सुसाईड नोट लिही. त्यामुळे डीआयजी मोरेला लवकर अटक होईल, असं अंकितने मुलीला सांगितले होते. अंकितच्या या प्लानसाठी मुलगी राजी झाली होती. ठरलेल्या प्लॅननुसार मुलीने ‘मी आत्महत्या करीत असून शोधण्याचा प्रयत्न करु नये, माझ्या आत्महत्येस डीआयजी मोरे जबाबदार आहे”, असंही सुसाईट नोटमध्ये लिहिले होते.

पीडित मुलीला अंकितने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे 5 जानेवारी 2020 रोजी अंकित मुलीच्या घराजवळ उभा होता. दोघे खारघर स्टेशनला गेले. तिथे लोकमान्य टर्मिनसला जाण्यासाठी त्यांनी तिकिट काढले. त्यानंतर सकाळी 5 वाजता दोघे उत्तरप्रदेशला निघून गेले होते. ज्यावेळी मुलगी बेपत्ता असल्याची बातमी सगळीकडे पसरली त्यावेळी अंकीतने आपली जागा बदलली. त्याने उत्तरप्रदेशहून थेट दिल्ली गाठले. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्याचाकडे पैसे नव्हते. त्याने मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन विकली आणि तिथून देहरादूनला गेला.

अंकितला माहित पडले होते की, पोलीस त्यांचा शोध घेत आहे त्यामुळे तो सतत जागा बदलत होता. देहरादूनला गेल्यावर त्याचे पैसे संपले होते. त्यानंतर मुलीने आपल्या वडिलांना फोन केला की, “पापा आप टेन्शन मत लो डीआयजी अरेस्ट होने के बाद मै घर आऊंगी” यावेळी तातडीने मुलीच्या वडिलांनी तळोजा पोलसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी देहरादून जाऊन या दोघांना ताब्यात घेतले. तसेच मुलीचे अपहरण करुन सोबत ठेवणाऱ्या अंकित सिंहवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर या प्रकरणाला अनेक वळणं आली होती. पनवेल कोर्टात निशिकांत मोरे यांच्या जामिनाची सुनावणी असतानाच मुलीच्या वडिलांना फोन आला ‘शांत रेहनेका मै उद्धव ठाकरे का ड्रायव्हर हू’, अशी धमकी दिनकर साळवे यांच्याकडून पीडित मुलीच्या कुटुंबाला देण्यात आली होती. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुबियांनी धमकी दिलेल्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

नेमकं प्रकरण काय?

पीडित मुलीच्या वडिलांनी 5 जून 2019 रोजी खारघरमध्ये तिच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी त्यांनी आरोपी डीआयजी निशिकांत मोरे यांनाही बोलावलं होतं. वाढदिवस साजरा करताना मुलीच्या भावाने तिच्या चेहऱ्यावर केक लावला. त्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या शरीरावरील केक जिभेने चाटला. आरोपी मोरेंच्या पत्नीनेच याचा व्हिडीओही तयार केला होता. हा व्हिडीओ पीडित मुलीच्या पालकांना पाठवत आरोपी मोरेंपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला होता.

या प्रकरणानंतर पीडित मुलीने आरोपी मोरेंविरुद्ध तक्रार दाखल केली. तर संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना धमकी दिली होती, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितले. विशेष म्हणजे ही घटना होऊन 5 महिने उलटूनही पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल न घेता गुन्हाही दाखल केला नव्हता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.