लॉकडाऊनदरम्यान होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का? मातोश्री परिसरातील बॅनरवरुन मनसेचा सवाल

"लॉकडाऊन नियमावलीत होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का," असा प्रश्न मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. (MNS Criticizes Shivsena on Congratulation banner)

लॉकडाऊनदरम्यान होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का? मातोश्री परिसरातील बॅनरवरुन मनसेचा सवाल
Follow us
| Updated on: May 20, 2020 | 8:22 PM

मुंबई : अवघ्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्याबद्दल उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं एक होर्डिंग शिवसेना नगरसेवकाने मातोश्री जवळील कलानगर परिसरात लावलं आहे. या बॅनरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला आहे. “लॉकडाऊन नियमावलीत होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का,” असा प्रश्न मनसे नेते अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे. (MNS Criticizes Shivsena on Congratulation banner)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी 18 मे रोजी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला. यानंतर शिवसेना नगरसेवक आणि सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी वांद्रे पूर्वेकडील कलानगर जंक्शन परिसरात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं मोठं होर्डिंग लावलं.

या होर्डिंगवर “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!” असे लिहिण्यात आले आहे. लॉकडाऊनदरम्यान शिवसेना नगरसेवकाने लावलेल्या या होर्डिंगबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

या होर्डिंगवरुन मनसे नेते अखिल चित्र यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 31 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनच्या या काळात होर्डिंगबाजी करायला नियमावलीत परवानगी आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान सदा परब प्रतिनिधीत्व करत असलेल्या एच पूर्व भागात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल चित्रे यांनी एच पूर्व भागात नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. (MNS Criticizes Shivsena on Congratulation banner)

संबंधित बातम्या : 

Uddhav Thackeray MLC Oath Ceremony| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ

आमचं सरकार प्रभावी, मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही, सल्ला दिला : पृथ्वीराज चव्हाण

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.