अजित पवार मुख्यमंत्रिपद सांभाळतात, 'सामना'लाही शॅडो संपादक, मनसेचा पलटवार

मुख्यमंत्री फक्त 10 ते 5 या वेळेत काम करतात. त्यांच्याकडे जास्त काम नाही, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. MNS answers Saamana Criticism

अजित पवार मुख्यमंत्रिपद सांभाळतात, 'सामना'लाही शॅडो संपादक, मनसेचा पलटवार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका झाल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही पलटवार केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद अजित पवार सांभाळतात, तर ‘सामना’लाही शॅडो संपादक आहेत, असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे. (MNS answers Saamana Criticism)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार सांभाळतात, मुख्यमंत्री फक्त 10 ते 5 या वेळेत काम करतात. त्यांच्याकडे जास्त काम नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांवर नजर ठेवण्यासाठी ‘मनसेच्या शॅडो कॅबिनेट’मध्ये पद दिलेले नाही, असं उत्तर संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही9’शी बोलताना दिलं.

‘एकही महत्त्वाचं खातं नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करत आहेत. त्यामुळे शॅडो मुख्यमंत्रिपद देऊन वेळेचा अपव्यय कशासाठी? असा विचार राजसाहेबांनी केला असावा’ असं संदीप देशपांडे ट्विटरवर म्हणाले होते.

दरम्यान, जनतेच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी मनसेची शॅडो कॅबिनेट काम करेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सर्वांवर बारकाईने लक्ष असेल, सर्वांचंच सर्वांवर लक्ष असेल, असं देशपांडे म्हणाले. राज ठाकरेंचे सुपुत्र, मनसे नेते अमित ठाकरेही चांगल्या प्रकारे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (MNS answers Saamana Criticism)

महाराष्ट्र किंवा देशातील विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो कॅबिनेट’चा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरु नये, असा टोला ‘सामना’तून लगावण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ‘हा खेळ जरी सावल्यांचा असला, तरी पिक्चर अभी बाकी आहे’ असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला.

मनसेच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त 9 मार्चला नवी मुंबईत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’ची घोषणा करण्यात आली होती.

‘सामना’त काय टीका?

‘लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही आणि राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. ‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की “जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करु नका” हे बरे झाले. पुन्हा शॅडो वाल्यांचे मुख्यमंत्रिपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता, तर योग्य ठरले असते. म्हणजे खेळ सावल्यांचा अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे. राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसले’, अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखातून मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’ची खिल्ली उडवण्यात आली. (MNS answers Saamana Criticism)

संबंधित बातम्या :

मला थेट संपर्क करा, शॅडो कॅबिनेटमध्ये वर्णी लावतो, राज ठाकरेंची खुली ऑफर

Raj Thackeray | लोकांना आमच्याकडून अपेक्षा, मात्र मतदान आम्हाला नाही : राज ठाकरे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *