'एमआरआय मशीनच आली नाही तर लोकार्पणाचा कार्यक्रम कसा?', डोंबिवलीत मनसे-शिवसेना आमनेसामने

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय आणि पॅथॉलॉजी सेवा सुरु करण्यात आली आहे (MNS slams Shiv Sena on Dombivli hospital program).

'एमआरआय मशीनच आली नाही तर लोकार्पणाचा कार्यक्रम कसा?', डोंबिवलीत मनसे-शिवसेना आमनेसामने

ठाणे : डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय आणि पॅथॉलॉजी सेवा सुरु करण्यात आली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या आरोग्य सेवेचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. मात्र, एमआरआय मशीन आलेलं नसताना लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या मुद्द्याचा धागा पकडत मनसेने निशाणा साधला. त्यामुळे डोंबिवलीत आता पुन्हा शिवसेना-मनसे आमनेसामने आल्याचं चित्र आहे (MNS slams Shiv Sena on Dombivli hospital program).

लोकार्पण कार्यक्रमाआधी मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोशल मीडियावर टीका केली. “डोंबिवलीत आरोग्य सेवेचा लोकार्पण कार्यक्रम होत आहे, मात्र अजून एमआरआय मशीन आलेली नाही. मग लोकार्पण कसले केले जात आहे?”, असा सवाल राजेश कदम यांनी केला.

लोकार्पण कार्यक्रमादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी “एमआरआय मशीन कोरोनामुळे येऊ शकली नाही. मशीन कस्टममध्ये आहे. लवकरच मशीन येताच ही सेवादेखील सुरु होईल”, असं स्पष्टीकरण दिलं (MNS slams Shiv Sena on Dombivli hospital program).

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 50 हजारच्या घरात पोहचली आहे. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहेत. सध्या केडीएमसीत 2 हजार 200 रुग्णांवर उपचार सुरु आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णांना फायदा व्हावा, यासाठी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एमआरआय, सिटी स्कॅन आाणि पॅथॉलॉजी सेवा सुरु करण्यात आली.

क्रेष्णा डायग्नोस्टिक या खाजगी कंपनीच्या माध्यमातून पीपीई तत्वावर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. याठिकाणी अल्प दरात सर्व प्रकारची सेवा नागरिकांना उपलब्ध असेल, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी आयुक्त आणि महापौरांच्या कामांचे कौतूक केले. या लोकार्पण कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे, नगरसेवक रमेश म्हात्रे, सभागृह नेते प्रकाश पेणकर हे उपस्थित होते.

संबंधित बातमी : पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, शिवसैनिकांची तुफान गर्दी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *